चक्क टोमॅटोच्या झाडाची बँड लावून काढली मिरवणूक…

 चक्क टोमॅटोच्या झाडाची बँड लावून काढली मिरवणूक…

वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील दोन वर्षात कोरोनामुळे टोमॅटो ला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होते मात्र यंदा टोमॅटो पिकाला चांगले दर मिळाल्याने टोमॅटो tomato उत्पादक शेतकरी farmers मालामाल झाले आहेत.

वाशीम जिल्ह्यातील देपूळ येथील ऋषिकेश गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटो ची लागवड केली. त्यांना यापासून एक हजार कॅरेट टोमॅटोच उत्पन्न मिळाले. संबंधीत शेतकऱ्याला ७०० ते एक १००० रुपये कॅरेट प्रमाणे दर मिळाले,यामधून त्यांना एक लाख लागवड खर्च वगळता ७ लाख  रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.त्यामुळं त्यांनी टोमॅटो च्या झाडाची बँड लावून गावात वाजत गाजत मिरवणूक काढून पाण्यात विसर्जन केले आहे.

बँड लावून वाजत गाजत मिरवणूक ही कोणत्या राजकीय पक्षांची नाही किंवा लग्नाची नाही. ही मिरवणूक आहे, टोमॅटोच्या झाडाची कारण ही तसंच आहे.यंदा केव्हा नव्हे तेवढा दर टोमॅटो ला मिळाला आहे. त्यामुळं या खुशीत शेतकऱ्यांनी गावात वाजत गाजत मिरवणूक काढली.

देपुळ गावात सिंचनाची सोय असल्याने शेतकरी  farmers पाला लागवड करतात. मात्र भाजीपाला पिकातून फारस उत्पन्न मिळत नाही. यंदा ऋषिकेश गंगावणे यांनी निवड केलेल्या टोमॅटो पासून एक हजार कॅरेटच उत्पन्न मिळालं शिवाय चांगले दर मिळाले आहेत.त्यामुळं मागील दोन वर्षात झालेलं नुकसान भरून निघालं आहे त्यामुळे मी आनंदात असून ही मिरवणूक काढली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलय.

भाजीपाला पिकाला भाव मिळत नाहीत, fare rate त्यामुळं उत्पादन खर्च ही वसूल होत नसल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याच आपण नेहमी बघतो. मात्र देपुळ येथील शेतकऱ्यांनी चक्क बँड लावून मिरवणूक काढल्यामुळे पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.

ML/KA/PGB

7 Jun 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *