शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये…; कृषिमंत्री दादा भुसे

 शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये…; कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जूनचा पहिला आठवडा उलटून गेला तरी राज्यात अद्यापही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करावी की नाही? त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. मात्र, मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.Farmers should not rush for sowing…; Agriculture Minister Dada Bhuse

या वर्षीच्या सुरुवातीलाच मान्सून सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र राज्यात अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून चिकमंगळूरमधील कारवार येथे कर्नाटक-गोवा सीमेवर पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अनुकूल राहिला तर 12 ते 13 जून दरम्यान राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. तसेच कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse )यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

यंदा मान्सून उशिरा असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, किमान 80 ते 100 मिमी पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने आपल्या शेतात पेरणी करू नये, असे दादा भुसे यांनी सांगितले. पुरेसा पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी काही काळ थांबावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

 

HSR/KA/HSR/7  June  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *