पाच हजाराने स्वस्त झाली ही इलेक्ट्रीक स्कुटर

 पाच हजाराने स्वस्त झाली ही इलेक्ट्रीक स्कुटर

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द्रव इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे आता इलेक्ट्रीक गाड्या घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यातच आता शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे पालक आपल्या पाल्यांसाठी दुचाकी खरेदी करत असतात. या पार्श्वभूमीवर OLA कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत ५ हजारांनी कपात केली आहे.

पूर्वी Ola S1 Pro ₹ 1,29,999 या किमतीत बाजारात उपलब्ध होती पण आता ₹ 5,000 ची कपात केली आहे. Ola इलेक्ट्रीकचे, सीईओ श्री भावीश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. Ola S1 Pro ची किमती ₹ 1,24,999 (प्रारंभिक किंमत) पर्यंत कमी करण्यात आली आहेत. ओलाला मार्केट लीडर बनून बाजारात अव्वल स्थान कायम ठेवायचे आहे आणि त्यामुळे किमती कमी आहेत.

दरम्यान इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरामुळे प्रदुषण कमी होते असा दावा केला जात असला तरी त्यासाठी लागणारी विज निर्माण करण्याच्या प्रक्रियेत मात्र प्रदुषण होतच असते. तसेच आधीच आवश्यक गरजांसाठी विज टंचाई होत असताना या इलेक्ट्रीक वाहनांसाठी विज उपलब्ध करून देणे भविष्यात कितपत साध्य होते. हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

SL/KA/SL

6 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *