सलग तिसऱ्या आठवड्यात बाजारात (Stock Market) १ टक्क्यांहून अधिक वाढ.

 सलग तिसऱ्या आठवड्यात बाजारात (Stock Market) १ टक्क्यांहून अधिक वाढ.

मुंबई, दि. 5 (जितेश सावंत):   दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात ECB आणि यूएस फेडरल रिझर्व्ह द्वारे केलेल्या दर वाढीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती परंतु मजबूत तिमाही निकाल, FIIचे समर्थन, व रुपयातील स्थिरता यामुळे सलग तिसऱ्या आठवड्यात बाजारात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि बाजाराने तेजीची परंपरा सुरूच ठेवली.
Dow closes 400 points higher, but snaps four-week win streak on rising rate fears.शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोरदार तेजी पहावयास मिळाली.शेवटच्या दिवशी डाऊ जोन्स ४०० अंकांनी वाढून बंद झाला.
गुंतवणूकदारांचे लक्ष भारताच्या ११ नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या आय.आय.पी (Industrial Production) डेटा कडे राहील. गुरु नानक जयंतीनिमित्त मंगळवारी 8 नोव्हेंबरला बाजार बंद राहतील.
Technical view on nifty- तांत्रिकदृष्ट्या निफ्टीकरिता १८,१३५-१८,१७८ चा टप्पा पार करणे जरुरी आहे. हा टप्पा पार केल्यास निफ्टी १८२३५-१८३१० चे स्तर गाठेल. निफ्टीसाठी १८,०१७-१७,९५० हे स्तर सपोर्टचे काम करतील हे तोडल्यास निफ्टी १७,८९०-१७,८३८ ची पातळी गाठेल.

बँक ऑफ इंग्लंडने 100 वर्षांतील सर्वात प्रदीर्घ मंदीचा इशारा दिला आहे
बँक ऑफ इंग्लंडने 1989 पासून कर्ज घेण्याचा दर 3 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर 100 वर्षांतील सर्वात दीर्घ मंदीचा इशारा ब्रिटनला दिला आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार यूकेची अर्थव्यवस्था अत्यंत आव्हानात्मक काळातून जात आहे. या उन्हाळ्यात सुरू झालेली मंदी 2024 च्या मध्यापर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. बँकेने सांगितले की बेरोजगारी 3.5 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे

निफ्टी पुन्हा १८,000 च्या वर.Nifty reclaims 18,000
अमेरिकन बाजारातील शुक्रवारच्या धमाकेदार तेजीचा असर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारावर साफ दिसून आला.सलग तिसऱ्या दिवशी मार्केटने विजयी घोडदौड सुरू ठेवली.सर्व क्षेत्रांमधील खरेदी, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि सकारात्मक जागतिक संकेत या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे 18,000 आणि 60,000 अंकांच्या वर बंद झाले.सेन्सेक्समध्ये ८०० अकांहून अधिकची वाढ झाली.सगळ्या सेक्टरचे निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.निफ्टी ऑटो, इन्फ्रा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फार्मा यात प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढ झाली.सोमवारी तेलाच्या किमती $ 1 पेक्षा जास्त घसरल्या.चीनमधील अपेक्षेपेक्षा कमकुवत फॅक्टरी डेटा आणि देशातील वाढत्या COVID-19 प्रतिबंधांमुळे मागणी कमी होईल या चिंतेमुळे क्रूडच्या किमतीत घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ७८६ अंकांनी वधारून ६०,७४६ वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत २२५ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १८,०१२ चा बंद दिला.

सेन्सेक्स ६१,००० च्या वर.Sensex tops 61,000
मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी नवीन महिन्याची जोरदार सुरुवात केली आणि बाजार सलग चौथ्या दिवशी सकारात्मक क्षेत्रात बंद झाला. सेन्सेक्स 61,000 च्या वर आरामात बंद झाला आणि निफ्टीने 18,150 च्या आसपास बंद दिला.FII आणि जागतिक बाजाराच्या पाठिंब्याने देशांतर्गत बाजारपेठेत जोरदार खरेदी दिसून आली. पीएमआय आकड्यात ऑक्टोबरमधील उत्पादन मजबूत राहिल्याचे दिसले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 374 अंकांनी वधारून 61,121 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत133 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,145 चा बंद दिला.

सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरला.Sensex falls 215 points
बुधवारी सलग चार दिवसांच्या तेजीला खीळ बसली. कारण रात्री होणाऱ्या यूएस फेडच्या बैठकीच्या निकालापूर्वी आणि आरबीआयच्या अनियोजित बैठकीच्या एक दिवस अगोदर गुंतवणूकदारानी सावध पवित्र घेतला व नफावसुलीला प्राधान्य दिले परंतु मेटल व फार्मा क्षेत्रात खरेदी दिसून आली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 215 अंकांनी घसरून 60,906 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत ६२ अंकांची घट होऊन निफ्टीने 18,082 चा बंद दिला.

Market ends with marginal cuts
फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्याने जागतिक बाजार कमकुवत होते त्यामुळे भारतीय शेअर्स नकारात्मक नोटवर उघडले.दुपारच्या सत्रात, निर्देशांकांवर विक्रीचा थोडासा दबाव दिसून आला परंतु शेवटच्या तासाच्या खरेदीमुळे तोटा कमी होण्यास मदत झाली.बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती. भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली.यूएस फेडने व्याजदर वाढवल्यानंतर भविष्यात छोट्या वाढीचा इशारा दिला.टेक महिंद्रा, हिंडाल्को , पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एनटीपीसी आणि इन्फोसिस ह्या निफ्टीमधील समभागात सर्वाधिक नुकसान झाले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 69 अंकांनी घसरून 60,836 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 30. अंकांची घट होऊन निफ्टीने 18,052 चा बंद दिला.

सेन्सेक्स ११४ अंकांनी वधारला.Sensex up 114 points
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अत्यंत अस्थिर अश्या सत्राची सुरुवात सपाट झाली.मिश्र जागतिक संकेतांनंतर बाजार सपाट उघडला आणि लवकरच नकारात्मक क्षेत्रात गेला परंतु मेटल आणि पीएसयू बँकांमधील खरेदीमुळे निर्देशांक वर येण्यास मदत झाली. बँक ऑफ इंग्लंडच्या पतधोरणाच्या घोषणेमध्ये फेडच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसले त्यामुळे येणाऱ्या पॉलिसी मध्ये व्याजदरात थोडी नरमाई दिसायची शक्यता निर्माण झाली यामुळे बाजारात रिकव्हरी दिसली. मात्र येऊ घातलेल्या मंदीच्या चिंतेमुळे फार्मा आणि आयटी समभागात विक्री सुरूच राहिली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 113 अंकांनी वधारून 60,950 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 64 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,117 चा बंद दिला.The stock market increased by more than 1 percent for the third consecutive week.

(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
5 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *