अभियानात गोदावरीचा समावेश नसल्याने आत्मक्लेष आंदोलन…

 अभियानात गोदावरीचा समावेश नसल्याने आत्मक्लेष आंदोलन…

नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या उपनद्यांचे जल अमृत व्हावे यासाठी नदी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. “चला जाणूया नदीला” या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश आहे. परंतु, नाशिकचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ‘आणि दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरणाऱ्या गोदावरी नदीचा मात्र नामोल्लेखही यात केलेला नाही. या प्रकारामुळे साधू महंत, पुरोहित संघ व पर्यावरणप्रेमींनी रामकुंड येथे आत्मक्लेश आंदोलन केले.As Godavari is not included in the campaign, self-immolation movement…

याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही शासन व प्रशासनाने गोदावरी नदीचा समावेश नदी यात्रा अभियानात केलेला नाही. गोदावरीचा यात समावेश नसणे हा मोठा अन्याय आहे.Godavari not being included in this is a great injustice.

त्यामुळे नाशिककरांकडून संताप व्यक्त होत असून यासाठी शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व यावेळी महंत भक्तीचरणदास महाराज, महंत राजाराम महाराज, सतीश शुक्ल, निशिकांत पगारे, राजू देसले, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, सोमनाथ मुठाळ, सुनील परदेशी, राहुल जोरे, वीरेंद्र टिळे, रोहित कानडे, तुषार पिंगळे, प्रभाकर वायचळे, सुरेश भोर, डॉ. अजय कापडणीस आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आत्मक्केश करणाऱ्यांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी करत सोडून दिले.

ML/KA/PGB
5 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *