महाराष्ट्रात गुंतवणूकदारांचा ओढा वाढतोय

 महाराष्ट्रात गुंतवणूकदारांचा ओढा वाढतोय

मुंबई दि १०– महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून यावर्षी राज्य पुन्हा परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थानी येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ टक्के कराराच्या बाबतीत प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्याना भरघोस मदत

भाजपा शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले.प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याकडे सरकार लक्ष देत आहे, असं ते म्हणाले.

अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना केवळ ७ हजार कोटींची मदत केली मात्र आमच्या सरकारनं आठ महिन्यात १२ हजार कोटी रुपयांची मदत दिली याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.

कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के टक्के निर्यात यंदा जास्त झाली आहे. नाफेडच्या माध्यमातून आतापर्यंत ४५ हजार 796 मेट्रिक टन कांदा सरासरी ९४२रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती देत कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं नाही असं फडणवीस यांनी सांगितलं.

पुढील 3 वर्षांमध्ये 30 टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणणार असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीत वीज मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

ML/KA/SL

10 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *