या अभिनेत्रीला UAE सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा

 या अभिनेत्रीला UAE सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

राष्ट्रीय पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कायमच अभिनय, फॅशन आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिती सेननला UAE सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे. शाहरुख खाननंतर क्रितीला गोल्डन व्हिसा मिळाला. याआधी देखील बऱ्याच बॉलिवूड स्टार्सना हा व्हिसा मिळाला आहे.

हा व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही यूएईमध्ये अभ्यास, व्यवसाय आणि तिथे राहू सुद्धा शकता. एकूणच यूएईमध्ये जर तुम्हाला वास्तव्य करायचं असेल तर गोल्डन व्हिसा फार महत्त्वाचा आहे. गोल्डन व्हिसा २०१९ पासून सुरु झाला आहे. क्रिती सेननच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना गोल्डन व्हिसा मिळाला आहे. याआधी यूएई सरकारकडून शाहरुख खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, बोनी कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग, कमल हसन, मोहनलाल, दुल्कर सलमान, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, फराह खान, सोनू सूद यांना गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

ईसीएच डिजिटलचे सीईओ इक्बाल मार्कोनी यांच्याकडून क्रिती सेननला हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. UAE सरकारकडून मिळणाऱ्या गोल्डन व्हिसासाठी अभिनेत्रीने २०१९ मध्येच प्रक्रियेला सुरूवात केली होती. अखेर अभिनेत्रीला तिचा व्हिसा मिळाला आहे. UAE सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर क्रिती म्हणाली, “UAEचा गोल्डन व्हिसा मिळणे हा सन्मान आहे. दुबई देशाप्रती माझ्या मनामध्ये एक विशेष स्थान आहे आणि मी आता त्यांच्या संस्कृतीचा भाग बनण्यास उत्सुक आहे.”

SL/KA/SL

26 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *