Taliban on Indian wheat: तालिबान अधिकार्‍यांच्या मते, भारताचा गहू दर्जेदार आणि पाकिस्तानचा गहू निकृष्ट दर्जाचा

 Taliban on Indian wheat: तालिबान अधिकार्‍यांच्या मते, भारताचा गहू दर्जेदार आणि पाकिस्तानचा गहू निकृष्ट दर्जाचा

नवी दिल्ली, दि. 5  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तान सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. तेथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानात अन्नधान्याची तीव्र टंचाई आहे. अशा परिस्थितीत भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने 2,000 मेट्रिक टन गव्हाची दुसरी खेप पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवली आहे..

भारताच्या मदतीनंतर पाकिस्ताननेही अफगाणिस्तानला मदत पाठवली आहे. मात्र, पाकिस्तानने पाठवलेला गहू निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा तालिबानने केला आहे. दुसरीकडे भारताने पाठवलेला गहू दर्जेदार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातून अफगाणिस्तानात गहू

पाकिस्तानने अफगाणिस्तानात निकृष्ट गहू पाठवला आहे. याचा खुलासा खुद्द तालिबानच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तालिबानचे अधिकारी पाकिस्तानकडून आलेल्या गव्हाची तक्रार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘तालिबान अधिकारी म्हणतात की पाकिस्तानमधून पाठवलेला गहू निकृष्ट दर्जाचा आहे, तर भारतीय गहू खूपच चांगला आहे. भारत गेल्या महिन्यापासून  अफगाणिस्तानला गहू पाठवत आहे.

गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. इम्रान खान गव्हाचा व्यवहार करून रशियातून परतले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने अफगाणिस्तानात निकृष्ट गहू पाठवला आहे. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत गहू आणि नैसर्गिक वायूचा करार केला आहे. इम्रान खान यांनी गेल्या गुरुवारी पुतीन यांची भेट घेतल्यानंतर सुमारे दोन दशलक्ष टन गहू आणि नैसर्गिक वायू आयात करण्याचा करार जाहीर केला आहे.

 

HSR/KA/HSR/05 March  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *