आठवडयाच्या शेवटी भांडवली बाजारात (Stock Market) तेजी.

 आठवडयाच्या शेवटी भांडवली बाजारात (Stock Market) तेजी.

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत) : गेल्या दोन आठवडयाचा नकारात्मक सिलसिला बाजाराने तोडला व या आठवडयाचा शेवट तेजीने झाला. सकारात्मक जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि FII ची विक्री कमी झाल्याने बाजारात २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या आठवडयात बाजारात चढउतार देखील प्रचंड प्रमाणात होते. गेल्या आठवड्यात, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ११,५११. ७७ कोटी रुपयांची विक्री केली , तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ११,६७०. ६२ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. परंतु रुपयातील घसरण सुरूच राहिली. २४ जून रोजी रुपया २७ पैशांनी घसरून ७८.३४प्रति डॉलरवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे लक्ष शनिवारी २५ जून रोजी G7, NATO बैठक,२७ जून बजाज ऑटो बायबॅक,२८ जून रोजी दोन दिवसांची gst council बैठक या कडे असेल.

या आठवडयात वरच्या स्तरावर निफ्टीसाठी १५,८००-१५,९०० हे अत्यंत महत्वपूर्ण स्तर आहेत हे स्तर जर पार झाले तर निफ्टी १६,२०० चा स्तर गाठू शकते

सलग सहा दिवसांच्या पडझडीला लगाम Market snaps 6-day losing streak
आठवड्याच्या पहिल्या दिवशी संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली.परंतु दिवसभर बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत राहिला शेवटच्या एका तासात झालेल्या खरेदीमुळे बाजार दिवसभराच्या उच्चतम पातळीजवळ बंद झाला. आय.टी आणि एफएमसीजी समभागांच्या खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.कमोडिटीच्या किमतीतील कमजोरीमुळे मेटल सेक्टरमध्ये घसरण सुरूच होती. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारून ५१,५९७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ५६ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,३५० चा बंददिला.Sensex, Nifty Snap Six-Day Losing Streak Aided By FMCG Stocks.

निफ्टी 15,600 च्या वर.Nifty above 15,600
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी पसरली. सकारत्मक जागतिक संकेत, क्रूड ऑइल मधील नरमाई,CLSA ची बाजाराबाबत सकारात्मक टिप्पणी या जोरावर सेन्सेक्स ११०० अंकांनी उसळला.विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीतील घट ,कमोडिटीच्या घसरलेल्या किमती यामुळे इक्विटी मार्केटला दिलासा मिळाला. बाजारात मंगळवारी चौफेर खरेदी पाहावयास मिळाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ९३४ अंकांनी वधारून ५२,५३२ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २८८ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,६३८ चा बंददिला.

सेन्सेक्स आणि निफ्टीत १% पेक्षा जास्त घसरण. Sensex and Nifty down more than 1%
दोन दिवसांच्या तेजीनंतर बाजारात पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरु झाला. कमकुवत जागतिक संकेत व चहुबाजूनी झालेला विक्रीचा मारा यामुळे सेन्सेक्स ७०० अंकांतून अधिक घसरला. क्रूड ऑइल मधील घसरणीचा फायदा बाजारला होताना दिसला नाही. बाजाराची नजर यू.एस फेड चेअरमनच्या स्पीचकडे होती . बीएसईवर १०० हून अधिक समभागांनी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ७०९ अंकांनी घसरून ५१,८२२ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २२५ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १५,४१३चा बंददिला.

निफ्टीने पुन्हा १५,५०० चा स्तर केला पार. Nifty back above 15,500
गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात प्रचंड चढउतार पाहावयास मिळाले. परंतु भारतीय बेंचमार्कने मागील सत्रातील बहुतेक नुकसान भरून काढले. स्मालकॅप-मिडकॅप समभागात तेजी होती. ऑटो सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त खरेदी पाहावयास मिळाली. सकाळच्या सपाट सुरुवाती नंतर जसजसा दिवस पुढे जाताना बाजारात तेजी पसरली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारून ५२,२६५ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १४३ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,५५६ चा बंददिला.
निफ्टीने दिला १५,७०० वर बंद. Nifty ends at 15,700

आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बाजारात चांगली तेजी पाहावयास मिळाली. कमोडिटीच्या किमती घसरल्याने जागतिक बाजारातील सकारात्मकतेचा प्रभाव भारतीय बाजारावर होताना दिसला.ऑटो,मेटल आणि एफएमसीजी समभागात खरेदी झाली. आय.टी वगळता बाकीच्या क्षेत्रात तेजी होती. वरच्या स्तरावर थोडी नफावसुली देखील पाहावयास मिळाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४६२ अंकांनी वधारून ५२,७२७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १४२ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,६९९ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analysआहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

25 Jun 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *