वराह पालनासाठी राज्य सरकार देणार 75 % पर्यंत अनुदान

 वराह पालनासाठी राज्य सरकार देणार 75 % पर्यंत अनुदान

मुंबई, दि. 13 :

राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारनं वराह पालन योजनेला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार वराह खरेदीसाठी शासन 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. तर, कुक्कुटपालन व मेंढी पालनाप्रमाणे वराह पालनासाठी ही 4 टक्के व्याज सवलत मिळणार आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला 50 टक्क्यांपर्यंत तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान मिळेल. वराह पालन गट 5 +1 असा निश्चित करण्यात आला असून प्रकल्प खर्च 208187 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

1.पशुपालन व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापुर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र.) किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र
2.दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
3.शेडसाठी जागा उपलब्ध असल्याचे तसेच वराह मोकाट सोडले जाणार नाही याबाबतचे स्वयंघोषणा पत्र.

या संदर्भातील अधिक माहिती महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयात उपलब्ध आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *