सिंधुदुर्ग-पुणे विमान सेवा 24 ऑगस्टपासून सुरू…
सिंधुदुर्ग दि ८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग-पुणे या मार्गासाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शनिवार- रविवारी सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.
पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळण्यात अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाईमंत्री आणि संरक्षणमंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. त्यानंतर आठवड्यातून दोन दिवसांसाठी विमानसेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ML/ ML/ SL
8 August 2024