फिलिपिन्समध्ये सापडले 10 हजार वर्ष पुरातन त्रिशूळ, वज्र
मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क): फिलिपिन्स या देशातील खाणीत हजारो वर्षांपूर्वीचे त्रिशूळ आणि वज्र् आढळून आले आहे. भारतीय पुरातत्व खात्याने ही दोन्ही आयुधे किमान दहा हजार वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज व्यक्त केला आहे.अशी माहिती सय्यद शमीर हुसेन यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना दिली.
सय्यद शमीर हुसेन हे २०१२ सालापासून खाण उद्योगात आहेत. याच व्यवसायाशी संबंधित कामांच्या निमित्ताने देश विदेशात त्यांची भ्रमंती सुरु असते. सय्यद यांचा ९ वर्षांचा संशोधनाचा अनुभव आहे. २०१५ साली फिलिपिन्स येथे अगुसान डेल नोर्ते विभागातील, सिरोन डोंगरावर पिरादा येथील खाणीत काम सुरु असताना एका कामगाराने त्यांना खाणीच्या ठिकाणी पाचारण केले. जमिनीच्या खाली २० फुटांवर त्याला धातूच्या दोन विचित्र वस्तू आढळून आल्या होत्या. सय्यद हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दोन्ही वस्तू बाहेर काढून पाण्याने धुण्यात आल्या. त्यातील एक वस्तू भगवान शंकराचा त्रिशूळ असल्याचे हुसेन यांच्या लक्षात आले. दुसऱ्या वस्तूचा नेमका उलगडा त्यांना झाला नव्हता. त्या वस्तूला त्यांनी लोखंडी सळीने स्पर्श केला असता त्यातून धातूचा आवाज आला. ती वस्तू कोणत्याही देवतेची मूर्ती नव्हती.
या दोन्ही वस्तू हिंदू संस्कृतीशी संबंधित असल्याचा अंदाज हुसेन यांना आला. त्या संदर्भात कुतूहल जागृत झाल्यामुळे या दोन्ही वस्तू हुसेन यांनी घरी आणल्या आणि त्यांची छायाचित्रे काढून आपल्या मित्रांना पाठवली. आणि त्या वस्तूंची सखोल माहिती घेण्यास सांगितले, सखोल अभ्यास केला असता त्रिशूळ सोबत असलेली दुसरी वस्तू भगवान इंद्राचे हत्यार वज्र्य असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर हुसेन भारतात आले आणि त्यांनी पुरातत्व विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. या दोन्ही वस्तू त्यांनी तिथे नोंदणीकृत करून घेतल्या, २०१५ सालापानून हुसेन हे या दोन्ही वस्तूंची काळजी घेत आहेत. विविध २५ देशांत प्रवास करून त्यांनी माहिती संकलित केली आहे. वज्र्य आणि त्रिशूळ यांचे महत्व जाणून घेण्यासाठी त्यांनी भारताचे सांस्कृतिक मंत्रालय, विविध संग्रहालये आदी ठिकाणी फेऱ्या मारल्या, विविध धर्मग्रंथांचा अभ्यास असलेले बिद्वान, स्वामी, योगी, इतिहासकार आणि संशोधक यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या दोन्ही वस्तू अतिप्राचीन असून त्यांच्यात खूप सामर्थ्य असल्याचे त्यांना अनेक जणांनी सांगितले. या दोन्ही वस्तूंच्या विक्रीसाठी काहीजणांनी त्यांच्यावर दबाव आणला. मात्र हुसेन यांनी त्याला ठाम नकार दिला.
SW/ ML/ SL
SL
8 August 2024