भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक आघाडीवर भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक रिसर्चने (SBI Research) आर्थिक वर्ष 2022 साठी आपला जीडीपी विकासाच्या (GDP Growth) अंदाजात बदल केला आहे. एसबीआय रिसर्चने तो 9.3 टक्क्यांवरुन वरून 9.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
एसबीआय रिसर्चच्या (SBI Research) चमूने त्यांचा अहवाल तयार करताना विविध घटक लक्षात घेतले. अहवालात म्हटले आहे की, देशाच्या जीडीपी विकासाचा (GDP Growth) अंदाज वाढवण्याचे मुख्य कारण म्हणजे जुलै ते सप्टेंबर 2021 (तृतीय तिमाही) या कालावधीत देशातील कोरोना प्रकरणांमध्ये केवळ 11 टक्के वाढ झाली आहे. कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या 15 देशांमधील हा दुसरा सर्वात कमी आकडा आहे.
याआधी, देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या संशोधन शाखेने मागील अहवालात भारताचा जीडीपी विकासाचा अंदाज 8.5 ते 9 टक्के वर्तवला होता. आता देशात लसीकरणाचा वेग आणि कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे, एसबीआय रिसर्चचा (SBI Research) सुधारित अंदाज रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक वर्ष 2022 साठी 9.6 टक्के करण्यात आला आहे.
भारतीय स्टेट बँकेचे समूह मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी सांगितले की, त्यांच्या नॉकास्टिंग मॉडेलनुसार, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासाचा (GDP Growth) अंदाज 8.1 टक्के रहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की यासह वास्तविक जीडीपी सुमारे 2.4 लाख कोटी रुपये असेल, जो आर्थिक वर्ष 20 मधील 145.69 लाख कोटी रुपयांच्या वास्तविक जीडीपीपेक्षा सुमारे 2.4 लाख कोटी रुपये अधिक आहे.
On the economic front, there is good news for India. State Bank of India (SBI) Research has revised its GDP growth forecast for FY2022. SBI Research has raised it from 9.3 per cent to 9.6 per cent.
PL/KA/PL/23 NOV 2021