रिझर्व्ह बँकेकडून जुलैमध्ये 7.205 अब्ज डॉलरची खरेदी

 रिझर्व्ह बँकेकडून जुलैमध्ये 7.205 अब्ज डॉलरची खरेदी

मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जुलै, 2021 मध्ये अमेरिकन डॉलरची (US dollars) निव्वळ खरेदीदार राहिली आहे. मध्यवर्ती बँकेने या कालावधीत स्पॉट मार्केटमधून 7.205 अब्ज डॉलर खरेदी केले. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सप्टेंबर 2021च्या मासिक प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की केंद्रीय बँकेने 16.16 अब्ज डॉलर (US dollars) विकत घेतले आणि 8.955 अब्ज डॉलरची विक्री केली. जून 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने 18.633 अब्ज डॉलरची निव्वळ खरेदी केली. या महिन्यात, बँकेने 21.923 अब्ज डॉलर खरेदी केले आणि 3.29 अब्ज डॉलरची विक्री केली. गेल्या वर्षी जुलैमध्ये मध्यवर्ती बँकेने निव्वळ आधारावर 15.973 अब्ज डॉलरची खरेदी केली होती.

रिझर्व्ह बँकेने स्पॉट मार्केटमधून 68.315 अब्ज amerikan डॉलरची खरेदी
RBI buys 68.315 billion US dollars from spot market

2020-21 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पॉट मार्केटमधून 68.315 अब्ज डॉलरची (US dollars) खरेदी केली. मध्यवर्ती बँकेने 2020-21 या आर्थिक वर्षात स्पॉट मार्केटमधून 162.479 अब्ज डॉलर खरेदी केले आणि 94.164 अब्ज डॉलर विकले. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये असे म्हटले आहे.
मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या अखेरीस फॉरवर्ड डॉलर बाजारात थकबाकी निव्वळ खरेदी 49.01 अब्ज डॉलर होती. जून 2021 मध्ये हा आकडा 49,573 अब्ज डॉलर होता.
The Reserve Bank of India has been the net buyer of US dollars in July, 2021. The central bank bought 7. 7.205 billion dollars from the spot market during the period. This is stated in the latest report of the Reserve Bank.
PL/KA/PL/17 SEPT 2021

mmc

Related post