चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रिव्हर्स रेपो दर वाढणार ?
मुंबई, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक आजपासून सुरू झाली. तीन दिवस चालणार्या बैठकीचे निकाल बुधवारी येतील, ज्यामध्ये रिव्हर्स रेपो दर (reverse repo rate) वाढण्याचा अंदाज आहे.
बैठकीपूर्वी, एसबीआय रिसर्चसह अनेक अर्थतज्ञांनी सद्यस्थिती कायम ठेवण्याची सूचना केली आहे. एसबीआय रिसर्चचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितले की, “कोविड-19 च्या नवीन प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता, सध्या अर्थव्यवस्थेला आणखी वेळ हवा आहे.
सुधारणांना गती मिळाली आहे, परंतु कर्जाचे व्याजदर आणि भांडवली पातळी कायम राखणे आवश्यक आहे. 8 डिसेंबरला होणार्या निर्णयांमध्ये रिव्हर्स रेपो दर (reverse repo rate) कायम ठेवावा लागेल जेणेकरून बाजाराची भांडवली गरज भागवता येईल. नोव्हेंबरमध्ये अतिरिक्त तरलता 7.6 लाख कोटी रुपये होती.
रेपो दर कमी असल्यामुळे एका दिवसाच्या ठेवींची पातळी 3.4 लाख कोटींवरून कमी होऊन 2.6 लाख कोटींवर आली आहे. फेब्रुवारीपर्यंत ही पातळी कमीच ठेवण्याची आवश्यकता आहे. कोटक इकॉनॉमिक रिसर्चने देखील फेब्रुवारीमध्ये रिव्हर्स रेपो दर (reverse repo rate) आणि रेपो दर सप्टेंबरनंतर वाढवण्याची सूचना केली आहे.
The meeting of the six-member Monetary Policy Committee (MPC) chaired by Reserve Bank of India (RBI) Governor Shaktikant Das began today. The results of the three-day meeting will be released on Wednesday, in which the reverse repo rate is expected to rise.
PL/KA/PL/06 DEC 2021
#RBI#Reserve Bank of India#MPC#Reverse Repo Rate