आरबीआयच्या (RBI) व्याज दरवाढीमुळे बाजाराची घसरगुंडी

 आरबीआयच्या (RBI) व्याज दरवाढीमुळे बाजाराची घसरगुंडी

मुंबई, दि. 7 ( जितेश सावंत ) : गेला आठवडा हा जागतिक बाजारात मोठी उलथापालथ करणारा ठरला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री झाली.जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे व्याजदरामध्ये केल्या जाणाऱ्या वाढीमुळे आर्थिक विकासाला धक्का बसू शकेल अशा चिंतेमुळे गुंतवणूकदाराच्या चिंतेत भर पडली व त्यांनी विक्रीचा सपाट लावला. बुधवारी अचानकपणे आर.बी.आय ने जाहीर केलेल्या ब्याजदर वाढीच्या निर्णयामुळे(मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे, भारतात देखील येणाऱ्या काळात व्याजदर वाढण्याची शक्यता आहे) भारतीय बाजार देखील मोठ्या प्रमाणात घसरले. महागाईची पातळी नियंत्रित करण्यासाठी उच्च दर वाढवण्याच्या गरजेचे मूल्यमापन केल्याने अमेरिकन मार्केटमध्ये देखील मोठी घसरण झाली. तसेच बँक ऑफ इंग्लंडने आपले व्याजदर वाढवताना, मंदीच्या संभाव्य धोक्याबद्दल चेतावणी दिली, ज्यामुळे गुंतवणूकदारांची भीती अधिक वाढली. सेन्सेक्स, निफ्टी दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. १००हून अधिक समभागांनी ५२आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली.

भारतीय बाजार घसरण्याची प्रमुख कारणे म्हणजे ग्लोबल सेल ऑफ,जागतिक वाढती महागाई, बॉण्ड यील्ड मधील वाढ,युक्रेनमधील युद्ध लवकर न संपण्याची चिन्हे,व मार्च तिमाहीच्या कमाईच्या हंगमाला बाजाराचा मूड उचलण्यात आलेले अपयश.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष,दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल तसेच सोमवारी ९ मे रोजी जाहीर होणाऱ्या जपान मॉनेटरी पॉलिसिच्या मिनिट्स,११ मे रोजी चीन व u.s चे रिटेल महागाईचे आकडे, १३ मे रोजी हॉंगकॉंग चे Q1 GDP चे आकडे याकडे असेल.

मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजार तांत्रिकदृष्ट्या कमजोर असल्याने मोठ्या प्रमाणात घसरण होऊन निफ्टीने १६,३४० चा स्तर गाठला बाजार अजूनहि तांत्रिकदृष्ट्या कमजोर आहे. जागतिक बाजारात जर मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली तर निफ्टी १५,८००-१५,७०० चा स्तर गाठी शकते.बाजार आजमितीला ओव्हरसोल्ड असल्याकारणाने बाजारात थोड्या प्रमाणात उसळी येऊ शकते वरच्या स्तरावर निफ्टी १६,८००-१६९०० चा स्तर गाठू शकते

अस्थिरतेमुळे बाजार सपाट बंद.Market ends flat amid volatility
कमकुवत जागतिक बाजारातील संकेतांमुळे आठवड्याच्या सुरवातीच्या दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीने झाली परंतु शेवटच्या तासातील खरेदीमुळे खालच्या स्तरावरून बाजारात रिकव्हरी झाली. फेडने नुकत्याच घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे व आगामी फेड बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध झाले होते तसेच जागतिक बाजारातील अस्थिरता देखील वाढली होती.डॉलरचा वाढता निर्देशांक, FII चा विक्रीचा उत्साह आणि वाढलेल्या वस्तूंच्या किमती यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ८४ अंकांनी घसरून ५६,९७५ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ३३ अंकांची घसरण होऊन १७,०६९चा बंददिला.

ईदनिमित्त ३ मे रोजी बाजार बंद होते.

आरबीआयच्या दरवाढीमुळे बाजाराला धक्का.RBI rate hike stuns markets
बुधवारी भारतीय बाजाराची सुरुवात सकारात्मक नोटवर झाली. परंतु लगेचच आशियाई बाजारातील संमिश्र संकेत व अमेरिकन फेडचा जाहीर होणार निर्णय या पार्श्वभूमीवर बाजार नकारत्मकतेकडे झुकला. त्यातच भर पडली ती अचानकपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ब्याजदर वाढीची,दुपारी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो दर वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. रेपो दरात ४० बीपीएसने वाढ केली.वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्याकरिता व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. आर.बी.आय ने कोरोना महामारी सुरू झाल्यापासून प्रथमच दर वाढ लागू करण्याचा निर्णय घेतल्याने आधीच अस्थिर असलेल्या बाजाराला याचा धक्का जबरदस्तपणे बसला व सेन्सेक्स १४०० अंकांनी गडगडला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,३०६ अंकांनी घसरून ५५,६६९ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ३९१ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १६,६७७ चा बंददिला. Markets plunge sharply after the Reserve Bank of India (RBI) announced a hike in key interest rate.

प्रॉफिट बुकींगमुळे मार्केट सपाट बंद. Profit booking results in flat closing for markets
यू.एस फेडच्या ०.५० रेट हाईक नंतर अमेरिकन बाजारात तेजी पसरली त्याचा परिणाम गुरुवारी आशियाई बाजारावर तसेच भारतीय बाजारावर दिसला आदल्या दिवशी अचानकपणे आर.बी.आय ने जाहीर केलेल्या ब्याजदर वाढीच्या निर्णयामुळे भारतीय बाजार मोठ्या प्रमाणात घसरले होते गुरुवारी बाजारात वाढ झाली परंतु बाजार बंद होईपर्यंत बाजाराने आपली बढत गमावली व बाजार सपाट बंद झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३३ अंकांनी वधारून ५५,७०२ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ५ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १६,६८२ चा बंददिला.

व्याजदर वाढीच्या चिंतेने बाजार १.५% घसरला.Market falls 1.5% on rate hike worries
आठवडयाच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजार १.५ टक्क्यांनी घसरला.जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे व्याजदरामध्ये केल्या जाणाऱ्या वाढीमुळे जागतिक आर्थिक विकासाला धक्का बसू शकेल अशा चिंतेमुळे गुंतवणूकदाराच्या चिंतेत भर पडली व त्यांनी विक्रीचा सपाट लावला. बाजाराची दिवसाची सुरुवात कमकुवत नोटेवर झाली आणि संपूर्ण सत्रात दबाव राहिला परंतु काही पॉवर स्टॉक्समध्ये खालच्या पातळीवर खरेदी झाल्याने थोडेसे इंट्राडे नुकसान भरून येण्यास मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ८६६ अंकांनी घसरून ५४,८३५ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २७१ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १६,४११चा बंददिला.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

7 May 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *