रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून

 रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलन विषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक आजपासून सुरू होत आहे. ही बैठक 6 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. कोराना साथीमुळे, अनेक तज्ञ असे गृहीत धरत आहेत की रिझर्व्ह बँक या वेळी देखील व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. पण त्यापेक्षाही रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असेल आणि किरकोळ महागाई आणि विकासाबाबत तीचे अंदाज काय असतील यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

रिझर्व्ह बँक व्याजदरात बदल करणार ?
Will RBI change interest rates?

याआधीची बैठक जूनमध्ये झाली, ज्यामध्ये रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता. चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee) सर्व सहा सदस्यांनी व्याजदरात कोणताही बदल न करण्याच्या बाजूने आपला निर्णय दिला होता, रिझर्व्ह बँकेने व्याजदर कायम ठेवण्याची ती सहावी वेळ होती. रिझर्व्ह बँक या वेळीही पतधोरण आढाव्यात व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. पतमानांकन संस्था इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ वृंदा जहागीरदार यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी
Less likely to change interest rates

या व्यतिरिक्त, पीडब्ल्यूसी इंडियाचे आर्थिक सल्लागार-सेवा रानन बॅनर्जी यांनी सांगितले की अमेरिकेची फेड रिझर्व आणि इतर मुख्य मध्यवर्ती बँकांनी यथास्थित कायम ठेवली आहे. आपली चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy Committee) देखील याच मार्गाचा अवलंब करेल. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश रेवणकर यांनीही सांगितले की, रिझर्व्ह बँक उच्च महागाई दर असतानाही रेपो दर आहे त्याच स्तरावर कायम ठेवेल. रेवणकर म्हणाले की, किरकोळ महागाईचे मुख्य कारण इंधनाचे दर वाढणे आहे, जे काही काळाने कमी होतील आणि महागाईचा दबाव कमी होईल.
बोफा ग्लोबल रिसर्चच्या अहवालात असे म्हटले गेले आहे की रिझर्व्ह बँकेची (RBI) चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy Committee) 6 ऑगस्टच्या आढाव्यात व्याज दर कायम ठेवेल. परंतू समिती सीपीआय महागाई दराचा अंदाज 5.1 टक्क्यांनी वाढवू शकते.
The meeting of the Monetary Policy Committee of the Reserve Bank of India is starting from today. The meeting will continue till August 6. Due to the Korana scandal, many experts are assuming that the Reserve Bank will not make any change in interest rates this time as well. But more than that, the focus will be on the role of the Reserve Bank and its forecasts for retail inflation and growth.
PL/KA/PL/4 AUG 2021

mmc

Related post