चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत धोरणात्मक दरात बदल होण्याची अपेक्षा नाही
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2021-22 (Fiscal year 2021-22) मध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) (Monetary Policy Committee) पहिली बैठक आजपासून सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीचे निर्णय 7 एप्रिलला जाहीर करण्यात येतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रिझर्व्ह बँक धोरणात्मक दर (policy rates) कायम ठेवू शकते. म्हणजेच धोरणात्मक दरात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या बैठकीतही कोणतेही बदल नाही
no change in the last meeting either
याआधी एमपीसीची बैठक फेब्रुवारीमध्ये झाली होती. 5 फेब्रुवारीला रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo rate) कोणताही बदल न करण्याची घोषणा केली होती. तज्ज्ञांच्या मते, यावेळी देखील रिझर्व्ह बँक सर्वसमावेशक चलनविषयक धोरण कायम ठेवू शकते. तज्ञांच्या मते, रिझर्व्ह बँक वाढीला चालना देण्यासाठी चलनविषयक कार्यवाही करण्यासाठी संधीची प्रतीक्षा करेल.
अनेक राज्यांमधील निर्बंधामुळे अनिश्चितता
Uncertainty due to restrictions in many states
डन अॅण्ड ब्रॅडस्ट्रिट यांनी दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की कोव्हिड-19 (Covid-19) रुग्णांमध्ये वेगाने होत असलेली वाढ आणि अनेक राज्यांत घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनिश्चितता वाढेल. तसेच औद्योगिक उत्पादनांच्या पुनरुज्जीवनातही अडथळा ठरेल. डन अँड ब्रॅडस्ट्रिटचे ग्लोबल चीफ इकॉनॉमिस्ट अरुण सिंह यांचे म्हणणे आहे की दीर्घ कालावधीत उत्पादन खूपच कठीण होत आहे. यामुळे कर्जात वाढ होईल. अरुण सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कर्जवाढीमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला (RBI) महागाईवरचा दबाव रोखण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागेल. महागाईचा दबाव आणि कोव्हिड-19 चे वाढते रुग्ण लक्षात घेता एमपीसीच्या पुढच्या बैठकीत रेपो दरात (Repo rate) बदल होण्याची अपेक्षा नाही.
रेपो दर बदलण्याची अपेक्षा नाही
The repo rate is not expected to change
एनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे अध्यक्ष अनुज पुरी यांचे म्हणणे आहे की ग्राहक महागाई मधील उतार चढाव कायम आहेत. ते सध्या स्थिर नाहीत. फेब्रुवारी 2020 पासून आतापर्यंत रेपो दरात 115 बेसिस पॉईंटची घट झाली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक (RBI) सध्याचा रेपो दर कायम ठेवू शकेल. भारत कोव्हिड-19 च्या (Covid-19) दुसर्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे अनेक राज्ये आणि शहरांमध्ये आंशिक टाळेबंदीची स्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात (Repo rate) बदल होण्याची अपेक्षा नाही.
रिझर्व्ह बँकेचे सध्याचे दर
RBI’s current rates
सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 4 टक्के आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.5 टक्के आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक दर (policy rates) समान ठेवले आहेत. 22 मे रोजी रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक दरात बदल केला होता. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo rate) कपात करुन तो 4 टक्के केला होता. ही त्याची ऐतिहासिक किमान पातळी आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर 4.25 आहे आणि बँक दर 4.25 टक्के आहे. बँकांना दिलेल्या कर्जावर रिझर्व्ह बँक वसुल करत असलेल्या व्याजाला रेपो दर असे म्हणतात. त्याच वेळी, बँकांनी जमा केलेल्या पैशांवर रिझर्व्ह बँक देत असलेल्या व्याजाला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.
The first meeting of the Monetary Policy Committee of the Reserve Bank of India for the financial year 2021-22 will begin today. The decisions of the meeting, which will be chaired by Reserve Bank Governor Shaktikant Das, will be announced on April 7. Experts say the RBI may maintain policy rates due to the rising number of corona patients.
PL/KA/PL/5 APR 2021