गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले

 गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले

मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुंतवणुकीत आणि व्यवसाय सुलभतेत सातत्याने सुधारणांच्या जोरावर गुजरात (Gujarat) हे देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या (RBI) अहवालानुसार त्याने महाराष्ट्राला (Maharashtra) दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.

 

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) म्हणण्यानुसार, 2012 ते 2020 पर्यंत गुजरातचे (Gujarat) सकल मूल्यवर्धन (GVA) सरासरी 15.9 टक्क्यांनी वाढून 5.11 लाख कोटी रुपये झाले आहे. याच कालावधीत महाराष्ट्राचे (Maharashtra) सकल मूल्यवर्धन 7.5 टक्क्यांनी वाढून 4.34 लाख कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच आठ वर्षांचा सरासरी विकासदर गुजरातच्या निम्मा होता.

गुजरातला (Gujarat) पुढे नेण्यात सर्वात मोठी भूमिका गुंतवणुकीची होती, जी 2012-2020 मध्ये 5.85 लाख कोटी रुपये होती. याच काळात महाराष्ट्रात (Maharashtra) 4.07 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. याशिवाय व्यवसाय परवाना मंजुरीसाठी एक खिडकी सुविधा, सुलभ कामगार कायदे आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना यासारख्या सुधारणांनीही गुजरातमध्ये मोठी भूमिका बजावली.

 

सेवा क्षेत्राबाबत बोलायचे झाले तर महाराष्ट्र आजही देशात आघाडीवर आहे. राज्याचे सेवा सकल मूल्यवर्धन 2020 मध्ये वार्षिक सरासरी 12.6 टक्के दराने वाढून 15.1 लाख कोटी रुपये झाले. सेवा क्षेत्रात, तामिळनाडू रु. 3.43 लाख कोटींच्या सकल मूल्यवर्धनासह दुसऱ्या, कर्नाटक रु. 2.1 लाख कोटींसह तिसर्‍या आणि उत्तर प्रदेश रु. 1.87 लाख कोटींसह चौथ्या स्थानावर आहे. 2020 मध्ये देशातील एकूण उत्पादन सकल मूल्यवर्धन 16.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Gujarat has become the largest manufacturing hub in the country due to continuous improvement in investment and ease of doing business. According to a report by the Reserve Bank of India, it has pushed Maharashtra to the second position.

PL/KA/PL/03 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *