मार्च 2022 पर्यंत बँकांची एकूण अनुत्पादित मालमत्ता 9.8 टक्क्यांपर्यंत पर्यंत वाढू शकेल

 मार्च 2022 पर्यंत बँकांची एकूण अनुत्पादित मालमत्ता 9.8 टक्क्यांपर्यंत पर्यंत वाढू शकेल

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीचा परिणाम बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच थकित कर्जावर होणे निश्चित मानले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या फायनान्शियल स्टॅबिलिटी (FSR) अहवालात सांगण्यात आले आहे की मार्च 2022 मध्ये बँकांचे एकूण अनुत्पादित मालमत्ता (Gross NPA) प्रमाण 9.8 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. मार्च 2021 च्या शेवटी बँकिंग क्षेत्राचे एकूण एनपीए प्रमाण 7.48 टक्के होते. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात सांगण्यात आले आहे की जर बँकांच्या मालमत्तांवर दबाव वाढला तर एनपीए 11.22 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल.

परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बँकांकडे पुरेसे भांडवल आहे
Banks have enough capital to deal with the situation

एफएसआर अहवालानुसार, मॅक्रो स्ट्रेस टेस्ट मधून बँकांचा एकूण एनपीए (Gross NPA) सर्वसाधारण परिस्थितीत मार्च 2021 मध्ये 7.48 टक्क्यांवरून वाढून 9.80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. परंतू या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बँकांकडे पुरेसे भांडवल असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. यावर्षी जानेवारीत जाहीर झालेल्या स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये (FSR) असे म्हटले होते की सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा एकूण एनपीए 13.5 टक्के होऊ शकेल. जे 22 वर्षातील सर्वाधिक असेल.

नियामक आधार महत्त्वाचा आहे
The regulatory support is important

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अलिकडच्या अहवालात (FSR) सांगण्यात आले आहे की तणावाच्या परिस्थितीतही बँकांकडे ग्रॉस आणि वैयक्तिक पातळीवर पुरेसे भांडवल आहे. सरकारी बँकांच्या बाबतीत एकूण एनपीए (Gross NPA) प्रमाण सर्वसाधारण परिस्थितीत मार्च 2021 मध्ये 9.54 टक्क्यांवरून वाढून 12.52 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पूर्वीच्या अंदाजापेक्षा हे चांगले आहे. यावरुन साथीदरम्यान बँकाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी नियामक आधार महत्त्वपूर्ण आहे. कोणतेही कर्ज 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस थकित राहिल्यानंतर ते एनपीए म्हणून वर्गीकृत केले जाते.
The Corona pandemic is expected to affect banks’ non-performing assets (NPAs). According to the Financial Stability (FSR) report released by the Reserve Bank of India (RBI), the gross NPA ratio of banks could increase to 9.8 per cent in March 2022.
PL/KA/PL/3 JULY 2021

mmc

Related post