रिझर्व्ह बँकेने या कंपनीला ठोठावला 2 कोटी रुपयांचा दंड

 रिझर्व्ह बँकेने या कंपनीला ठोठावला 2 कोटी रुपयांचा दंड

मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (TCPSL) आणि ऍपनिट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडला (ATPL) दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या एका निवेदनात या दोन्ही कंपन्यांना आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती दिली. त्यानुसार टीसीपीएसएलला (TCPSL) 2 कोटी रुपये आणि एटीपीएलला (ATPL) 54.93 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, “टीसीपीएसएलने व्हाईट लेबल एटीएम बसवणे आणि निव्वळ संपत्ती संबंधीच्या सूचनांचे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे. त्याच वेळी, एटीपीएलने एस्क्रो खात्यांमधील शिल्लक आणि निव्वळ संपत्ती बाबतच्या तरतुदींचे पालन केले नाही.

व्यावसायिक आस्थापनांमध्ये पैसे भरण्यासाठी पीएसओ यंत्र बसवणाऱ्या टीसीपीएसएल (TCPSL) आणि एटीपीएल (ATPL) या दोन कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने नोटीसही पाठवली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तराचा आढावा घेतल्यानंतर मध्यवर्ती बँकेने त्यांना दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले की या दोन्ही पीएसओ प्रदात्यांवर दंड आकारण्याचे कारण नियमांचे पालन न करणे हे आहे आणि त्याचा त्यांच्या ग्राहकांसोबत झालेल्या व्यवहारांच्या वैधतेशी काहीही संबंध नाही.

दुसर्‍या एका निवेदनात, रिझर्व्ह बँकेने केरळ येथील कंपनी मुलामुत्तिल फायनान्शियर्स लिमिटेडला देखील 20 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. अनुत्पादित मालमत्तेचे वर्गीकरण करण्या संबंधीच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल ती दोषी आढळली आहे.

The Reserve Bank of India (RBI) has fined Tata Communications Payment Solutions Limited (TCPSL) and Appinet Technologies Pvt Ltd (ATPL) for non-compliance. A statement from the Reserve Bank of India (RBI) said the two companies had been fined.

PL/KA/PL/25 NOV 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *