रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक सुधारणांना गती देण्यावर चर्चा
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) केंद्रीय संचालक मंडळाने सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेला (economy) चालना देण्यासाठी केंद्रीय बँकेने उचललेल्या पावलांचा आढावा घेतला. शुक्रवारी संचालक मंडळाची ही बैठक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची ही 590 वी बैठक होती.
रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयांचा आढावा
Review of decisions taken by the RBI
रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक आणि देशांतर्गत पातळीवरील आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि कोरोना साथीमुळे झालेले दुष्परिणाम कमी करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने अलिकडे टाकलेली पावले आणि प्रयत्न यांचा आढावा घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, संचालक मंडळाने बैठकीत स्थानिक संचालक मंडळाच्या कामगिरीचे मूल्यमापन देखील करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक पावले उचलली
The RBI has taken several steps to boost the economy
गेल्या वर्षी कोरोना साथीच्या वाढत्या संसर्गामुळे देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर भारताची आर्थिक स्थिती काहीशी नाजूक झाली होती. संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर आर्थिक परिस्थिती थोडी सावरली होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा आर्थिक घडामोडींची गती थोडी मंदावली. हे पाहता, रिझर्व्ह बँकेने (RBI) अर्थव्यवस्थेला (economy) गती देण्याच्या उद्देशाने अनेक पावले उचलली होती.
आढावा घेण्यासाठी आभासी बैठकीचे आयोजन
Organize a virtual meeting to review
अर्थव्यवस्थेला (economy) गती देण्यासाठी टाकलेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक आभासी बैठक आयोजित केली होती. रिझर्व्ह बँकेच्या या बैठकीला डेप्युटी गव्हर्नर महेश कुमार जैन यांच्यासह मायकेल देबब्रत पात्रा, एम राजेश्वर राव आणि टी रबी शंकर आणि इतर संचालक सतीश के मराठे, एस गुरुमूर्ती, रेवती अय्यर आणि सचिन चतुर्वेदी देखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त, वित्तीय सेवा विभागाचे सचिव देबाशीष पांडा आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ हे देखील बैठकीत सहभागी झाले होते.
The Central Board of Directors of the Reserve Bank of India (RBI) reviewed the current economic situation and the steps taken by the Central Bank to revive the economy. The meeting of the Board of Directors was held on Friday under the chairmanship of Reserve Bank Governor Shaktikant Das through video conferencing. This was the 590th meeting of the Board of Directors of the Reserve Bank.
PL/KA/PL/14 AUG 2021