मोठ्या बँकांना दोन लेखापरिक्षकांकडून करुन घ्यावे लागेल लेखापरिक्षण
नवी दिल्ली, ता.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मोठ्या आकाराच्या बँका आणि शहरी सहकारी बँकांना (यूसीबी) किमान दोन लेखापरिक्षक ( Auditors) नियुक्त करावे लागतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले आहे की या दोन्ही लेखापरीक्षकांमध्ये कोणताही संबंध असू नये आणि दरवर्षी नियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती होण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
व्यवहार आणि मालमत्तेवर अवलंबून
Depending on the transaction and the property
रिझव्र्ह बँकेने (RBI) म्हटले आहे की, 15 हजार कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या वित्तीय संस्थांना किमान दोन लेखापरिक्षण संस्थांच्या संयुक्त पथकाद्वारे वैधानिक लेखापरीक्षण करावे लागेल. ज्या बँकांचा ताळेबंद (Balance sheet) 15 हजार कोटींपेक्षा कमी आहे ते एका लेक्षापरिक्षकाकडूनच ( Auditor) लेखापरिक्षणाचे काम पूर्ण करू शकतात. मात्र दोन्ही परिस्थितींमध्ये बँकेशी आधीपासूनच संबंधित समवर्ती लेखा परीक्षकांना वैधानिक लेखापरीक्षक करता येणार नाही. या व्यतिरिक्त संबंधितांकडून लेखापरीक्षकाची संख्या निश्चित केली जाऊ शकते जे त्यांचे आकार, जोखीम, विविध प्रकारच्या व्यवहारावर आणि मालमत्तेच्या प्रसारावर अवलंबून असेल.
बँकांच्या आकारासह लेखापरिक्षकांची संख्या वाढेल
The number of auditors will increase with the size of the banks
5 लाख कोटी चार लेखापरिक्षक
20 लाख कोटी पर्यंत आठ लेखापरिक्षक
5 ते 10 लाख कोटीपर्यंत सहा लेखापरिक्षक
20 लाख कोटींपेक्षा जास्त 12 लेखा परीक्षक
सलग तीन वर्षांसाठीच नियुक्ती
Appointment for three consecutive years only
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की लेखा परीक्षकांचे ( Auditors) स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये सलग तीन वर्षांपर्यंत नेमणूक करता येईल. जर त्यादरम्यान कोणतेही लेखा परीक्षक काढले गेले तर पुढील पाऊल उचलण्यासाठी बँकेला रिझर्व्ह बँकेची (RBI) परवानगी घ्यावी लागेल.
Large size banks and urban co-operative banks (UCBs) will have to appoint at least two auditors. The Reserve Bank of India (RBI) has said that there should be no connection between the two auditors and it will be mandatory to seek the permission of the Reserve Bank before appointment or reappointment every year.
PL/KA/PL/29 APR 2021