रिझर्व्ह बँकेने मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला

 रिझर्व्ह बँकेने मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला

मुंबई, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोव्याच्या ‘द मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा’ परवाना (license) रद्द केला आहे. केंद्रीय बँकेच्या मते, ही सहकारी बँक सध्याच्या आर्थिक स्थितीत आपल्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम परत करण्यास सक्षम नाही. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 99 टक्के ठेवीदारांना ठेवी विमा आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) (DICGC) संपूर्ण ठेवीची रक्कम परत मिळेल.

आता काय होईल ?
What will happen now?

रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) बँकेचा परवाना (license) रद्द झाल्यानंतर लिक्विडेशनच्या वेळी प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसी कडून 5 लाखांपर्यंतची ठेव रक्कम परत मिळते. मागील वर्षी सरकारने बँक ठेवींसाठी विमा संरक्षण 1 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढविले होते. रिझर्व्ह बँकेने गोव्यातील सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाला बँक बंद करण्यासाठी आणि बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश जारी करण्याचे आवाहन केले आहे.

जनहितावर विपरित परिणाम झाल्याचे दिसले असते
The public interest would have been adversely affected

रिझर्व्ह बँकेने (RBI) म्हटले आहे की द मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच उत्पन्न मिळण्याची शक्यता देखील दिसत नाही. केंद्रीय बँकेच्या म्हणण्यानुसार, ही सहकारी बँक बँकिंग नियमन कायदा 1949 च्या विविध तरतुदींचे पालन करण्यात अपयशी ठरली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बँकेचा परवाना (license) रद्द करून असे म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक स्थितीत बँक आपल्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देण्याच्या स्थितीत नाही. बँकेला पुढील व्यवसाय करण्यास परवानगी दिली गेली तर त्याचा जनहितावर विपरित परिणाम झाल्याचे दिसले असते.

बँक कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करू शकणार नाही
The bank will not be able to conduct any type of banking transaction

रिझर्व्ह बँकेने (RBI) म्हटले आहे की परवाना (license) रद्द झाल्यावर द मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कोणतेही बँकिंग व्यवहार करू शकणार नाही. या आदेशानंतर बँक कोणाकडूनही ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा ठेवी परत करू शकणार नाही.
सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर आणि लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
The Reserve Bank of India (RBI) has revoked the license of Goa’s The Madgaon Urban Co-operative Bank Limited. According to the central bank, the co-operative bank is not able to repay the entire amount to its depositors in the current financial situation. According to the central bank, about 99 per cent of the depositors will get their entire deposit back from the Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC).
PL/KA/PL/30 JULY 2021

mmc

Related post