राजू शेट्टी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

 राजू शेट्टी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांचा शक्ती प्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापुरात राजू शेट्टींकडून यानिमित्ताने विराट शक्तीप्रदर्शन करण्यात आले .

खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात खोक्याचा बाजार करणारी झुंडी एका बाजूला माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसं, विचारवंत माझ्यासोबत आहेत, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सांगितलं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून विराट शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीसाठी दंड थोपटले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शेट्टी यांची दसरा चौकातील मैदानावर सभा पार पडली. यावेळी बोलताना शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तसंच सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली.Raju Shetty filed the nomination form

ML/ML/PGB
15 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *