शेतकऱ्याकडून लाच घेणारे PSI अटक

 शेतकऱ्याकडून लाच घेणारे PSI अटक

लातूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस भरतीसाठी गावखेड्यांतील तरुण अधिक प्रमाणात तयारी करताना दिसतात. पोलिस भरती झाल्यावर लोकांना न्याय मिळवून देऊन व्यवस्था बदलण्याची स्वप्नही अनेकजण पाहत असतात. मात्र काही वेळा शेतकऱ्यांकडूनच पोलीसांनी लाच स्वीकारल्याचा घटना उघडकीस आल्याने कुंपणानेच शेत खाल्ल्यांची भावना लोकांमध्ये निर्माण होते. अशीच एक शेतकऱ्यांकडून पोलिसाने लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी (ACB) PSIला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20,000 लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारास तहसील कार्यालयाच्या प्रागंणातून रंगेहाथ पकडले. तर, याप्रकरणी पोलीस उप निरीक्षकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण होऊन चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रूपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाललुचपत प्रतिबंधक विभागाने पांडुरंग दिगंबर दाडगे, (वय 43वर्षे), पद पोलीस हवालदार नेमणूक पोलीस स्टेशन चाकूर आणि दिलीप रघुत्तमराव मोरे, (वय 33 वर्ष), पद- पोलीस उपनिरीक्षक, वर्ग 2, (अराजपत्रित), नेमणूक- पोलीस स्टेशन चाकूर अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून लाचेच्या रकमेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून या घनटेमुळे जिल्हा पोलीस प्रशासनावर लाचखोरीचा खळबळ निर्माण झाली आहे.

SL/ML/SL

7 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *