अनिल परब यांच्यावर गुन्हा

 अनिल परब यांच्यावर गुन्हा

दापोली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना (ऊबाठा) नेते अनिल परब यांच्यावर दापोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. Police Case registered against Anil Parab

दापोलीतील मुरुड इथे बांधलेल्या रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीशी संगनमत करून त्यांनी कर आकारणी करून शासन आणि ग्रामपंचायत यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दापोली पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी रूपा दिघे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुरेश तुपे आणि ग्रामसेवक अनंत कोळी हेदेखील सह आरोपी आहेत.

ML/KA/SL

8 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *