स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार

 स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार

औरंगाबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत . आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं . यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला . Aaditya Thackery Aurangabad Visit

राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही , राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला जातोय . त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना भेटतील तिथे “देता की जाता ?” हे विचारा असं आवाहन केलंय .

महाराष्ट्र देशाला आजवर दिशा देत आलाय . महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे, सुपीक जमीन आहे , कुशल तरुण आहेत . पण या राज्यातून प्रकल्प राज्यातून परत जातायत . पर राज्यात प्रकल्प जाण्याचं वाईट वाटत नाही , तर आपल्या राज्यातून प्रकल्प इथे न थांबता परराज्यात जातायत त्याचं वाईट वाटतंय . महाराष्ट्राने आवाज बुलंद केला नाही तर देश मागे जाईल . पण महाराष्ट्र पुढे गेला तर देशही पुढे जाईल. पण गद्दार ५० खोक्यात अडकलेत असं म्हणत स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना करत जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलंय .

गृहमंत्र्यांना आजवर एवढं हतबल पाहिलं नाही

राज्यातील प्रकल्प गेले तरी मोठा प्रकल्प राज्यात आणू म्हणणारे देवेंद्र फडणवीस ते आणू शकले नाहीत . त्यावरून आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर एवढं हतबल आजवर कधीही पाहिलं नाही . आजवर कायदा आणि सुव्यस्थेचा एवढा बोजवारा उडालेला पहिला नाही , असं म्हणत संभाजीनगर इथल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला आहे .

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे . गद्दार आमदार म्हणतात चुन चुन के मारेंगे, खरं तर मागे पाठीत वार करणारे पळून जातात आणि म्हणतात चुन चुन के मारेंगे . तर कोणी पोलीस ठाण्यात गोळीबार करतं पण कारवाही होत नाही . तर काही मंत्री संवीधानिक पदावर असणाऱ्या महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करतं , पण तरीही कोणितीही कारवाही न करता केवळ समज दिली जाते.

ML/KA/SL

8 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *