कशेडी घाटात अपघात , ४ ठार
महाड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त आहे.Accident in Kashedi Ghat, 4 killed
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹ ५ लक्ष मदत जाहीर केली आहे.
काल रात्री पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्ती मयत झाल्या असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.
1)हालीमा अब्दुल सलाम पोपेरे
2) अमन उमर बहुर 46
3) आसिया सिद्दीक
4) नाजमीन मूफीद
अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
ML/KA/PGB
8 Nov .2022