या राज्यात आता उसाच्या रसावर GST
लखनऊ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उसाचा रस हा शेतीमाल नाही. ऊस हे फळही नाही आणि भाजीपालाही नाही, असा अजब निष्कर्ष काढत उत्तर प्रदेशात आता उसाच्या रसावर GST आकारला जाणार आहे. उसाचा रस हा व्यापारी तत्त्वावर विकला जात असेल तर त्यावर 12 टक्के जीएसटी कर द्यावाच लागेल, असा अजब निर्णय उत्तर प्रदेशातील जीएसटी अॅडव्हान्स रुलिंग अथॉरिटीने घेतला आहे.मात्र रस्त्यावरील गाड्यावरील ऊसाच्या रसावर जीएसटी असणार नाही. . मात्र, हाच ऊसाचा रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याच्या बिलात जीएसटी अंतर्भाव होऊ शकतो.
यूपी अथॉरिटी फॉर एडवांस रूलिंग च्या म्हणण्यानुसार, उसाचा रस हा शेतीमाल नाही. ऊस हे फळही नाही आणि भाजीपालाही नाही. त्यामुळे उसाच्या रसावर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
साखर किंवा गुळ तयार करण्यासाठी उसाचा रस हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. त्यामुळे त्यावर 12 टक्के जीएसटी लावला जाऊ शकतो, असे उत्तर प्रदेशातील जीएसटी विभागाने दिले आहे. सदर राज्यातील गोविंद सागर मिल्सने उसाच्या रसावर जीएसटी लागू होईल का, याची माहिती घेण्यासाठी जीएसटी अथॉरिटीकडे संपर्क केला. त्यावेळी ही बाब पुढे आली.
लखीमपूर खेरी येथील गोविंद सागर शुगर मिल्स लिमिटेडच्या अर्जाची सुनावणी करताना युपीएएआरने हा निर्णय दिला आहे.
अर्जदार मिल कंपनी इथेनॉल आणि मोलॅसिसचे उत्पादन करते. ज्यासाठी कच्चा माल म्हणून ऊस वापरला जातो. कृषी उत्पादन असल्यामुळे उसाला जीएसटीमधून सूट आहे. मात्र, कंपनी उसाचे गाळप करून रस काढते. या रसापासून साखर तयार केली जाते.
तसेच मोलॅसिस हा या प्रक्रियेतून तयार होणारा उप-पदार्थ आहे. कंपनी साखरेवर ५ टक्के आणि मोलॅसिसवर २८ टक्के या दराने जीएसटी शुल्क भरते. कंपनीला उसाचा रस राज्यातील एका डिस्टिलरीला विकायचा आहे. ज्याचा वापर ही डिस्टीलरी इथेनॉल किंवा स्पिरीटच्या उत्पादनासाठी करू शकते.
त्यामुळेच त्यावर जीएसटी आकारण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
SL/KA/SL
1 April 2023
SL/KA/SL
1 April 2023