यावर्षी कर संकलन चांगले होणार, अनेक वस्तूंवर दर बदलण्याची गरज

 यावर्षी कर संकलन चांगले होणार, अनेक वस्तूंवर दर बदलण्याची गरज

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महसूल सचिव तरुण बजाज यांनी बुधवारी सांगितले की, कॉर्पोरेट क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे, जी अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट आहे. या क्षेत्राच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2021-22 मध्ये चांगला कर (Tax) महसूल अपेक्षित आहे. परंतू अशा अनेक वस्तू आहेत ज्यावर जीएसटी दर (GST Rate) बदलण्याची आवश्यकता असू शकते. परंतु आधी प्रणाली स्थिर करणे आवश्यक आहे.

जास्त असलेले दर कमी करण्यावर भर
Emphasis on reducing high rates

सीआयआयच्या कार्यक्रमात बोलताना बजाज म्हणाले की, जीएसटीचे  उच्च दर (GST Rate) मोटर वाहन क्षेत्रावर परिणाम करत आहेत. त्यामुळे जीएसटी परिषद खूप जास्त असलेले दर कमी करण्यावर भर देईल. परिषद करमुक्त श्रेणीतून काही वस्तू वगळेल आणि उलट कर रचना (Tax) दुरुस्त करेल. या दरम्यान त्यांनी खासगी कंपन्यांना अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

काही वर्षांसाठी अधिक कर भरावा लागेल
Will have to pay more tax for a few years

बजाज म्हणाले की, आम्ही करात (Tax) ना वाढ केली आहे आणि ना त्यात जास्त हस्तक्षेप करत आहोत. आम्ही तुम्हाला अधिक कर भरायलाही सांगत नाही. मोटार वाहन क्षेत्रात करांचे दर (GST Rate) जास्त आहेत. आम्ही चारचाकी वाहनांवर केवळ 28 टक्के करच लावत नाही तर उपकर देखील वसुल करतो, जे खूप जास्त आहे. हे आणखी काही वर्षे सुरु राहील.

जीएसटी संकलन अर्थसंकल्पाच्या अंदाजाच्या 26.6 टक्के आहे
GST collection is 26.6 per cent of the budget estimate

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत निव्वळ जीएसटी (GST) संकलन 1.67 लाख कोटी रुपयांहून अधिक होते, जे 2021-22 साठी 6.30 लाख कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या अंदाजाच्या 26.6 टक्के आहे.
 
Revenue Secretary Tarun Bajaj said on Wednesday that the performance of the corporate sector has been better than expected, which is a good thing for the economy. Good tax revenue is expected in 2021-22 due to the excellent performance of this sector. But there are many items on which the GST rate may need to be changed. But first the system needs to be stabilized. Net GST collection in April-June quarter of the current financial year was over Rs 1.67 lakh crore.
PL/KA/PL/12 AUG 2021

mmc

Related post