नीट पेपर लिक प्रकरणाबाबत भेंडी बाजार येथे झाली जनजागृती मोहीम

 नीट पेपर लिक प्रकरणाबाबत भेंडी बाजार येथे झाली जनजागृती मोहीम

मुंबई, दि १८
मुंबादेवी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तसेच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्यायाची मागणी करण्यासाठी भेंडी बाजार येथे जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले. त्यास विद्यार्थ्यांचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
नीट परीक्षेचे पेपर लिक होण्यासारखे गंभीर प्रकार आज या भारतात होत आहे. हे शिक्षण व्यवस्थेला लागलेला एक कलंक आहे. शिक्षणामध्ये अशा प्रकारचे प्रकार वारंवार मोठ्या संख्येने घडत आहे यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आणि भाजप सरकार काही एक शब्द बोलत नसून हा विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक व्यवस्थेचा एक पराभव आहे. आम्ही विद्यार्थ्यांना याबाबत जनजागृती केली असून यापुढे देखील आमचेही जनजागृती अशीच सुरू राहील अशी माहिती
यावेळी मुंबादेवी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष जुनैद कुरेशी यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली,. यावेळी माजी नगरसेवक जावेदभाई जुनेजा, दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष भाई सय्यद फुरकान अहमद, माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष भाई अदनान परॅक, जिल्हा सरचिटणीस अदनान कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *