एन डी ए सरकारचे खाते वाटप जाहीर, पहा कोणाला मिळाले कोणते विभाग

 एन डी ए सरकारचे खाते वाटप जाहीर, पहा कोणाला मिळाले कोणते विभाग

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल संध्याकाळी मोदी 3.0 कॅबिनेटचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज संध्याकाळी एनडीए सरकारनं खातेवाटपही जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळाने रविवारी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांसह 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री यांचा समावेश आहे. त्यानंतर आज कॅबिनेट मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

यंदाच्या खातेवाटपात विशेष करुन महत्वाच्या खात्यांमध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खातं, तर अमित शाहांकडे पुन्हा गृह आणि सरकार खातं देण्यात आलं आहे. तसेच एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोण-कोणत्या खात्याची जबाबदारी आहे, हे जाणून घ्या.

नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदासोबतच अंतराळ मंत्रालय आणि अणुऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यासोबतच पंतप्रधान मोदींकडे कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन खात्याची जबाबदारीही आहे.

 • पंतप्रधानांकडे ‘या’ मंत्रालयांची जबाबदारी
 • कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय (Ministry of Personnel, Public Grievances and Pensions)
 • अणुऊर्जा मंत्रालय (Department of Atomic Energy)
 • अंतराळ मंत्रालय (Department of Space)

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कुठलं खातं?

 • अमित शाह- गृहमंत्रालय
 • राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
 • एस जयशंकर – परराष्ट्र
 • नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
 • निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
 • शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
 • अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
 • जितन राम मांझी- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय

 • पियुष गोयल -वाणिज्य
  अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
  भूपेंदर यादव – पर्यावरण
  के राममोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
  जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
  सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
  सी आर पाटील- जलशक्ती
  किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री
  धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
  अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री
  चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
  प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय
  ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
  मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
  हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
  एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री
  मनोहर लाल खट्टर- उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
  राजीव राजन सिंह – पंचायत राज मंत्रालय
  विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्रालय
  ज्युएल ओराम- आदिवासी विकास मंत्री
  गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय
  गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
  किशन रेड्डी – कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

SL/ML/SL

10 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *