शिवसेनेच्या आमदारांची बैठक, मुख्यमंत्र्यानी केले मार्गदर्शन

शिवसेनेच्या आमदारांची बैठक, मुख्यमंत्र्यानी केले मार्गदर्शन
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार उपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या आमदारांनी तशी पूर्वकल्पना पक्ष नेतृत्वाला दिलेली होती. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यश अपयशाचा ऊहापोह करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती ठरवण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. Meeting of Shiv Sena MLAs, Chief Minister guided
ML/ML/PGB
10 Jun 2024