मानोलीत ढगफुटी सदृश्य परिस्थिती ,पुरात महिला बेपत्ता
परभणी, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवत तालुक्यातील मानोली शिवारात आज चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढ्याला पूर आला या पुरात दोन महिला वाहून गेल्या होत्या. यात सुनिता लव्हाळे( वय ४०) ही पुरात वाहून गेली तर दुसऱ्या महिलेने झाडाला घट्ट धरल्याने रंजना सुरवसे या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत तर सुनीता लव्हाळे या बेपत्ता आहेत यांचा शोध गावकरी, प्रशासन घेत आहेत.
दरम्यान, सुनिता लव्हाळे ही शोधाशोध करूनही उशिरा पर्यंत सापडली नाही. Cloudburst-like situation in Manoli, woman missing in floods
ML/ML/PGB
10 Jun 2024