नगर जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार, उत्कर्षा रूपवते वंचित मध्ये

 नगर जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार, उत्कर्षा रूपवते वंचित मध्ये

अहमदनगर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. त्यामुळे ऐन निवडणुक काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

रूपवते यांनी शिर्डी ३८ या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जागेवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मिळण्यासाठी विशेष आग्रह धरला होता. मात्र या मतदार संघातून महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करीत पत्रकार परिषदेत त्यांनी अन्य मार्ग स्वीकारण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी काल अपेक्षेप्रमाणे अकोला येथे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना अधिकृत प्रवेश दिला आहे. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण,जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते.

दरम्यान एकेकाळी देशात हक्काचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात यंदा शिर्डी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. उत्कर्षा रूपवते या काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात आणि दिवंगत प्रेमानंद रुपवते यांची मुलगी आहे. तसेच त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. त्यांच्या प्रवेशाने या मतदार संघातून त्यांची उमेदवारी दाखल होऊन तिरंगी लढत होईल असे चित्र दिसते.

ML/ML/SL

18 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *