महाराष्ट्राच्या शेजारील या राज्यात सापडले लिथिअमचे साठे

 महाराष्ट्राच्या शेजारील या राज्यात सापडले लिथिअमचे साठे

बंगळुरू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला उभारी देऊन अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या लिथिअम धातूचा मोठा साठा या वर्षांच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीर राज्यात सापडला होता. आता महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यातही लिथिअम या अत्यंत दुर्मिळ धातूचे साठे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील मारलागल्ला भागात (मंड्या जिल्हा) लिथियमचा साठा सापडला आहे.

कर्नाटकात लिथियमचा साठा सापडल्यानंतर खाण आणि कोळसा मंत्रालयाने संसदेत माहिती दिली की, अणुऊर्जा विभागाने तपासणी केली असून मंड्या जिल्ह्यात लिथियमचा साठा सापडला आहे. त्यात लिथियमचे प्रमाण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

लिथिअम धातूचे महत्त्व

  • लिथियम हा कोणत्याही प्रकारची बॅटरी तयार करण्यासाठी लागणारा प्रमुख घटक आहे.
  • लिथियम हा नॉन-फेरस धातू असून तो इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरला जातो.
  • मोबाइल, इलेक्ट्रिक वाहन, सोलार पॅनलमध्ये लिथियम धातूचा वापर अनिवार्य आहे. लिथियम आयन बॅटरीशिवाय या वस्तू तयार होऊ शकत नाही.
    लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो.
  • सध्या भारत लिथियमसाठी चीन, जपान , दक्षिण कोरिया, इंडोनेशिया , अर्जेंटिना या देशांवर अवलंबून राहावे लागते.
  • भारतात मोठ्या प्रमाणावर लिथियमची आयात केली जाते. २०२० पासून भारत लिथियम आयातीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. यापैकी ८० टक्के भाग चीनकडून मागवला जातो.
  • भारतात लिथियमच्या उपलब्धतेमुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मोठा बूस्ट मिळू शकतो. आतापर्यंत भारत लिथियमसारख्या महत्त्वाच्या वस्तू बाहेरून आयात करायचा, परंतु आता जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये लिथियमची उपलब्धता असल्याने बॅटरी निर्माते आणि ईव्ही कंपन्यांना आयातीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

SL/KA/SL

4 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *