नवीन वर्षात ही बँक ठेवींवर शुल्क आकारणार

 नवीन वर्षात ही बँक ठेवींवर शुल्क आकारणार

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काही दिवसांनी नवीन वर्ष 2022 सुरू होणार आहे. त्याचबरोबर अनेक बँकांचे नियमही बदलणार आहेत. टपाल विभागाची बँक असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (India Post Payments Bank) ग्राहकांनाही मोठा झटका बसणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील (India Post Payments Bank) बचत खात्यात 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी आता शुल्क द्यावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील बचत आणि चालू खात्यांमध्ये विनाशुल्क एका महिन्यात फक्त 10,000 रुपये जमा करता येणार आहेत. आयपीपीबीने आपल्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे की 10,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payments Bank) तीन प्रकारची बचत खाती उघडली जातात, ज्यात मूलभूत बचत खाते, बचत खाते यांचे वेगवेगळे नियम आहेत. बँकेत ज्या ग्रहकांचे मूलभूत बचत खाते आहे ते त्यांच्या खात्यातून दर महिन्याला विनाशुल्क 4 वेळा पैसे काढू शकतात, परंतु त्यानंतर, रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना 0.50 टक्के शुल्क भरावे लागेल, जे किमान 25 रुपये असेल. 1 जानेवारीपासून मर्यादेची मुदत संपल्यानंतर पैसे काढणे आणि जमा करणे यासाठी शुल्क आकारले जाईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

 

मूलभूत बचत खात्याव्यतिरिक्त अन्य बचत खाते आणि चालू खात्यात 10,000 रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. जर ग्राहकांनी 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढले तर त्यांना 0.50 टक्के शुल्क भरावे लागेल, जे प्रति व्यवहार किमान रु 25 असेल. बचत आणि चालू खात्यांमधून दरमहा रु 25,000 पर्यंत रोख रक्कम काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 0.50 टक्के शुल्क आकारले जाईल.

ग्राहकांना मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यास 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति व्यवहार द्यावे लागतील. रिझर्व्ह बँकेने म्हटले होते की बँकांना जास्त इंटरचेंज शुल्काची भरपाई आणि खर्चात सामान्य वाढ पाहता, त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहक शुल्क 21 पर्यंत वाढवण्याची परवानगी आहे. ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्क तब्बल 7 वर्षांनंतर वाढवण्यात आले आहे.

The New Year 2022 is about to begin in a few days. At the same time, the rules of many banks are about to change. The customers of India Post Payments Bank, a postal bank, will also be hit hard. There will now be a charge for depositing more than Rs 10,000 in a savings account with India Post Payments Bank.

PL/KA/PL/21 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *