भारतीय पुरुष-महिला रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

 भारतीय पुरुष-महिला रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

बहामास, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

भारतीय महिला आणि पुरुष रिले संघ 4×400 मीटर रिलेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. बहामास येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स रिलेमध्ये सोमवारी भारतीय महिला संघाने दुसऱ्या फेरीतील हीटमध्ये दुसरे स्थान पटकावले. पुरुष संघानेही पॅरिससाठी दुसऱ्या हीटमध्ये दुसरे स्थान मिळवून पात्रता मिळवली. महिलांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये रुपल चौधरी, एमआर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन यांनी 3 मिनिटे 29.35 सेकंद वेळ नोंदवली आणि जमैकाचा संघ 3.28.54 गुणांसह प्रथम क्रमांकावर राहिला.पुरुषांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये, मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या संघाने 3 मिनिटे आणि 3.23 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. तर USA पुरुष संघ 2:59.9 च्या वेळेसह प्रथम राहिला.

भारतीय महिला संघाने रविवारी पहिल्या फेरीच्या पात्रता फेरीत 3 मिनिटे 29.74 सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले होते. पहिल्याच हीटमध्ये राजेश रमेशने माघार घेतल्याने पुरुष संघ पात्र ठरू शकला नाही.तिन्ही हीटमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाला ऑलिम्पिक कोटा मिळेल.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी बहामास येथे होणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स रिलेमध्ये तीन हीटमध्ये पहिले दोन स्थान मिळवणाऱ्या संघांना ऑलिम्पिक कोटा मिळणार आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी दुसऱ्या हीटमध्ये दुसरे स्थान मिळवले. त्यामुळे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात.

SL/ML/SL
6 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *