व्ही-आर बॉक्स मधून घर बसल्या पाहता येईल मतदान केंद्राची स्थिती

 व्ही-आर बॉक्स मधून घर बसल्या पाहता येईल मतदान केंद्राची स्थिती

अहमदनगर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर तसेच शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी डॉ .अमोल बागुल,जिल्हा मतदारदूत यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदरच मतदान केंद्राच्या आतील रचना आणि मतदान प्रक्रियेचा क्रम समजण्यास सुलभ व्हावा म्हणून व्ही आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार आहे.

अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदान प्रक्रियेत व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या प्रयोगाचे राज्य तसेच देश पातळीवर कौतुक होत आहे. मतदान केंद्राचा एक मिनिटाचा थ्रीडी व्हिडिओ गुगल- मायक्रोसॉफ्ट , ॲपल टीचर डॉ.बागुल यांनी तयार केला असून तो मोबाईलमध्ये लावून व्ही आर बॉक्स आणि गिअरच्या माध्यमातून आपण बसल्या जागी मतदान केंद्राच्या आतील प्रवेश,मतदान अधिकारी क्रमांक एक , दोन , तीन , त्यांची कार्य तसेच वोटिंग कंपार्टमेंट, व्हीव्हीपॅट मशीन आणि निर्गमन प्रवेशद्वार आदी मतदानाच्या क्रमिक प्रक्रिया लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना जणू मतदान केंद्रातच आपण उभे आहोत की काय या पद्धतीने पाहता येणार आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य मतदारांना मतदानाची प्रक्रिया सहज सोपी सुलभ होऊन मतदान टक्केवारीत वाढ व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,पुणे येथे संपन्न झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद प्रशिक्षण कार्यशाळेत संतोष अजमेरा – संचालक (स्वीप-भारत निवडणूक आयोग),आराधना शर्मा -वरिष्ठ सल्लागार-स्वीप, एस.
चोक्कलिंगम (मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र ),किरण कुलकर्णी -अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,शरद दळवी -उप मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्यभरातील स्वीप नोडल अधिकारी यांच्यासमोर तसेच अहमदनगरमध्ये शक्ती सिंग, ममता सिंग, (निवडणूक निरीक्षक -खर्च) , अजय कुमार बिष्ट (निवडणूक निरीक्षक -सामान्य) यांच्या स्वीप आढावा बैठकीत अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी)यांनी “व्ही आर बॉक्स मधून मतदान केंद्राचे दर्शन ” हे प्रात्यक्षिक सादर केले. भारतातील सर्वात मोठ्या स्वीप मंडपम कक्षामध्ये जिल्ह्यातील निवडक स्विफ्ट कक्षांमध्ये देखील हे उपकरण नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

ML/ML/PGB 6 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *