यावर्षी देशाची अर्थव्यवस्था 12 टक्क्यांच्या दराने वाढेल – मुडीजचा अंदाज

 यावर्षी देशाची अर्थव्यवस्था 12 टक्क्यांच्या दराने वाढेल – मुडीजचा अंदाज

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) 2021 या कॅलेंडर वर्षात 12 टक्क्यांची वाढ पहायला मिळु शकते. पतमानांकन संस्था मूडीज ऍनालिटिक्सने (Rating agency Moody’s Analytics) हा अंदाज वर्तवला आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 7.1 टक्क्यांच्या घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेची नजीकच्या भविष्यातील शक्यता खुपच अनुकूल झाली आहे. मूडीज ऍनालिटिक्सने शुक्रवारी सांगितले की, 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीचा दर 0.4 टक्के होता. मूडीजच्या मते, हे अपेक्षापेक्षा खुपच चांगले आहे कारण जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी घसरली होती.
पतमानांकन संस्थेच्या मते, निर्बंध शिथिल झाल्यानंतर देश-विदेशातील मागणी सुधारली आहे. यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत उत्पादनात वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.

देशांतर्गत मागणीत वाढ
Increase in domestic demand

अग्रगण्य पतमानांकन संस्थेने पुढील काही तिमाहीत खासगी वापरामध्ये वाढ आणि त्यामुळे 2021 मध्ये देशांतर्गत मागणीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 2021 मध्ये जीडीपीचा वास्तविक विकास दर 12 टक्के असू शकेल असा मूडीजचा अंदाज आहे. मागील वर्षाचा खालचा आधार देखील यामागील एक कारण आहे.

रेपो दर कायम राहील
repo rate will remain the same

मूडीजची अपेक्षा आहे की चलनविषयक आणि वित्तीय धोरणे वाढीच्या अनुकूल असतील. त्यांचे म्हणणे आहे की 2021 या कॅलेंडर वर्षात धोरणात्मक दरात कोणतीही अतिरिक्त कपात केली जाणार नाही. तो (रेपो दर) चार टक्केच राहील असे आमचे मत आहे.
मात्र संस्थेने 2021-22 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या7 टक्क्यांच्या जवळपास पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 2021 मध्ये महागाई दरामध्ये नियंत्रित वाढ होईल, परंतू खाद्यपदार्थांच्या वस्तू किंवा इंधन महागल्याचा परिणाम कुटुंबाच्या खर्चावर होईल असे मूडीज ने सांगितले.
The Indian economy is expected to grow by 12 per cent in the 2021 calendar year. The rating was made by Moody’s Analytics, a rating agency. According to the agency, the near-term outlook for the Indian economy is very favorable after a 7.1 per cent decline last year. However, the agency expects the fiscal deficit to reach close to 7 per cent of GDP in 2021-22. In 2021, there will be a controlled rise in inflation, but rising food prices or fuel will affect household spending, Moody’s said.
PL/KA/PL/20 MAR 2021
 

mmc

Related post