भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीच्या मार्गावर; टाळेबंदीमुळे लागू शकतो धक्का – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

 भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीच्या मार्गावर; टाळेबंदीमुळे लागू शकतो धक्का – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) (International Monetory Fund ) म्हणणे आहे की भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वेगाने प्रगतीच्या मार्गावर आहे. परंतू कोरोना (corona) संसर्गाचे पुन्हा वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन लागू होणार्‍या टाळेबंदीमुळे सुधारणेला धक्का बसू शकतो. आयएमएफचे प्रवक्ते गॅरी राईस यांनी एका परिषदेत सांगितले की कोरोना साथीच्या धक्क्यातून सावरलेली भारतीय अर्थव्यवस्था सुधारणेच्या मार्गावर आहे. 2020 च्या चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढ पुन्हा सकारात्मक होऊ शकते, जे साथीच्या प्रारंभानंतर पहिल्यांदाच असेल. सकल आणि स्थिर भांडवलाची वाढ हे त्याचे मुख्य कारण आहे.
जागतिक बँकेसमवेत पुढच्या महिन्यात होणार्‍या बैठकीपूर्वी राईस यांनी सांगितले की यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये पीएमआय (खरेदी व्यवस्थापक निर्देशांक) व्यवसाय आणि इतर आकडेवारी निरंतर सुधारणा दर्शवत आहेत. मात्र कोरोना (corona) साथीची दुसरी लाट आणि स्थानिक पातळीवर अनेक शहरांमध्ये टाळेबंदी (Lockdown) यामुळे काही धोके निश्चितच निर्माण झाले आहेत. याचा परिणाम आर्थिक आणि व्यवसायिक घडामोडींवर होऊ शकतो आणि त्यामुळे सुधारणेच्या मार्गावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) धक्का लागू शकतो. आयएमएफ 6 एप्रिलला जागतिक आर्थिक परिस्थिती जाहीर करू शकते.
आयएमएफने (International Monetory Fund ) 2021-22 दरम्यान भारताचा विकास दर 11.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, साथीचा भारतावर फारच वाईट परिणाम झाला होता, परंतु कंपन्यांनी या धक्क्यातून सावरुन कामकाज सुरू केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विकास दरावर दिसून येईल.

मूडीजनेही व्यक्त केला होता अंदाज
Moody’s also expressed predictions

याआधी मूडीज ऍनॅलिटिक्सने अंदाज व्यक्त केला होता की 2021 या कॅलेंडर वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 12 टक्क्यांची वाढ होईल. गेल्या वर्षी 7.1 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) नजीकच्या भविष्यातील संभाव्यता अधिक अनुकूल झाल्याचे मूडीज ने सांगितले होते. डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) विकास दर 0.4 टक्के होता. ही कामगिरी अपेक्षेपेक्षा खूप चांगली आहे. त्याआधीच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 7.5 टक्क्यांची घसरण झाली होती. मूडीज ने सांगितले की निर्बंध शिथिल केल्यावर देश आणि परदेशात मागणी वाढली आहे. यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत उत्पादन वाढले आहे.
The International Monetary Fund (IMF) says that the Indian economy is growing rapidly. However, due to the recurrence of corona infection, the implementation may be hampered by the lockout. IMF spokesman Gary Rice told to a conference that the Indian economy, which had recovered from the Corona outbreak, was on track to recover.
PL/KA/PL/27 MAR 2021

mmc

Related post