भारताचा विकास दर 12.5 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) अंदाज व्यक्त केला आहे की आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 12.5 टक्के राहू शकतो. अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जानेवारीच्या आपल्या अंदाजात सुधारणा केली आहे. जानेवारी 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अंदाजात म्हटले होते की 2021-22 मध्ये भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) 11.5 टक्के दराने वाढेल. भारतात कोव्हिड-19 ची (covid-19) दुसरी लाट पहायला मिळत असतानाच जागतिक संघटनेने भारताच्या विकास दराशी संबंधित अंदाजात ही सुधारणा केली आहे.
अनिश्चततेची स्थिती
A state of uncertainty
उल्लेखनीय आहे की कोव्हिड-19 च्या (covid-19) प्रसारामुळे अनेक राज्यांनी रात्रीची संचारबंदी आणि टाळेबंदी सारखे कठोर निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. त्यामुळे आशियाच्या तिसर्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेत विकासा संदर्भात अनिश्चिततेची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) अंदाजानुसार 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर (GDP) चीनपेक्षाही जास्त असू शकेल. कोव्हिड-19 (covid-19) संकटादरम्यान गेल्यावर्षी सकारात्मक अंकानी वाढ करणार्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये केवळ चीनचाच समावेश होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.9 टक्के दराने वाढू शकते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये विक्रमी आठ टक्क्यांची घट पहायला मिळाली होती.
2021 मध्ये सहा टक्के जागतिक वाढ होण्याची अपेक्षा
Global growth is expected to be six percent in 2021
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ म्हणाल्या की पूर्वीच्या अंदाजांच्या तुलनेत 2021 आणि 2022 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जोरदार सुधारणा होईल असा आमचा अंदाज आहे. 2021 मध्ये सहा टक्के आणि 2022 मध्ये 4.4 टक्के जागतिक वाढ होण्याची आमची अपेक्षा आहे. सन 2020 या कॅलेंडर वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत 3.3 टक्क्यांची घट पहायला मिळाली होती. गोपीनाथ यांनी यासोबतच विषाणूच्या वाढत्या संसर्गाचाही उल्लेखही केला आहे. त्या म्हणाल्या की साथ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
The International Monetary Fund (IMF) has projected India’s growth rate to be 12.5 per cent in FY 2021-22. Thus, the International Monetary Fund has revised its January forecast. In January 2021, the International Monetary Fund (IMF) had projected that the Indian economy would grow at 11.5 per cent in 2021-22.
PL/KA/PL/7 APR 2021