टिम इंडीयाचा धडाकेबाज विजय
मेलबर्न, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज टिम इंडीयाने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे.रविचंद्रन अश्विन सर्वाधिक ३ बळी घेऊन आणि सूर्यकुमार यादव २५ बॉल्समधअये ६१ धावांची तडाखेबंद खेळी करून या विजयाचे शिल्पकार ठरले.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ५ गडी गमावून ८६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ६१ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट २४४ होता. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. केएल राहुलनेही फलंदाजी करताना ३५ चेंडूत ५१ धावा केल्या. भारताने झिम्बाब्वे समोर ठेवलेले १८६ धावांचे आव्हान पार करताना त्या संघाची चांगलीच दमछाक झाली. झिम्बाब्वेचा डाव १७.२ षटकांत सर्वबाद ११५ धावांत आटोपला.
आजचा झिम्बाब्वेवरचा विजय भारताला फायदेशीर ठरला आहे. . आता पहिल्या गटामधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाबरोबर भारताचा सेमी फायनलमध्ये सामना होणार आहे. पहिल्या गटात पहिल्या स्थानावर न्यूझीलंड आहे, तर दुसरे स्थान इंग्लंडने पटकावले आहे. आहे.
तर टी-२० विश्वचशषकातील दुसरा सेमी फायनलचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना आता १० नोव्हेंबरला गुरुवारी अॅडलेडच्या मैदानात होणार आहे.
त्यापूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना हा बुधवारी ९ नोव्हेंबरला सिडनीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहेत आणि स्टार स्पोर्ट्सवर प्रसारण पाहता येईल
SL/KA/SL
6 Nov. 2022