अखेर ठाकरेंच्या वाघिणीने मैदानं मारलं

 अखेर ठाकरेंच्या वाघिणीने मैदानं मारलं

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी 66हजार 247 मतं मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला.

पहिल्याच निवडणुकीत मशाल हे चिन्ह घेऊन लढलेल्या सेनेला इतक्या प्रमात मताधिक्य मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.दादर येथील सेनाभवनाबाहेर शिवसैनिकांचा विजयाचा जल्लोष सुरु झाला आहे.

ऋतुजा लटके यांचे पती आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या अंधेरी मतदार संघात पोटनिवडणूक झाली. भाजपाने या निवडणूकीतून माघार घेतली होती. मात्र लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम होते. आज सकाळी सात वाजलेपासून मतमोजणी सुरु झाली.
सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मते 19 फेऱ्यांमध्ये मोजण्यात आली. पहिल्या फेरीपासूनच ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीअखेर त्यांना 4277 मते मिळाली होती. तर दुस-या फेरी अखेर त्यांना 7817 मते मिळाली.

दुस-या क्रमांकाची मते नोटाला मिळाली. पहिल्या फेरी अखेर नोटाला 622 मते मिळाली. नोटाच्या मतांमध्येही मोठी वाढ होत गेली. दुस-या क्रमांकाची मते नोटाला मिळाल्याबद्दल सर्वांनाच आश्रर्य वाटत होते. अंतिम फेरीअखेर नोटाच्या मतांची संख्या 12776 इतकी झाली.
मात्र, नोटाच्या पर्यायाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. सरतेशेवटी ऋतुजा लटके यांना 66,247 तर नोटाला 12778 मतं मिळाली.
यावेळी ऋतुजा लटके यांनी, हा विजय म्हणजे जनसेवेची पोचपावती आहे. स्व. रमेश लटके यांनी अंधेरीच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ML/KA/PGB
6 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *