प्रत्यक्ष कर ‘विवाद से विश्वास’ योजनेला मुदतवाढ

 प्रत्यक्ष कर ‘विवाद से विश्वास’ योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रत्यक्ष कराशी (Direct Tax) संबंधित प्रकरणे निकाली काढण्यासाठी लागू असलेली ‘विवाद से विश्वास’ योजना (Vivad Se Vishwas Scheme) स्वीकारण्याची अंतीम मूदत 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे अशी माहिती प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) ट्विटद्वारे दिली आहे. त्याशिवाय योजनेअंतर्गत शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखही 30 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. तत्पूर्वी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी ठेवली होती.
प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) ट्वीट करुन सांगितले आहे की, ‘सीबीडीटीने ‘विवाद से विश्वास’ कायदा 2020 (Vivad Se Vishwas Act 2020) नुसार घोषणापत्र दाखल करण्यासाठीची तारीख 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. ‘विवाद से विश्वास’ अंतर्गत कोणतीही अतिरिक्त रक्कम भरण्याची तारीखही 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी अस्तित्त्वात आलेल्या प्रत्यक्ष कर ‘विवाद से विश्वास’ कायदा 2020 (Vivad Se Vishwas Act 2020) अंतर्गत आतापर्यंत 1,25,144 प्रकरणे निकाली निघाली आहेत. विविध अपीलीय मंचांसमोरील एकूण 5,10,491 कर संबंधित प्रलंबित प्रकरणांच्या हे एक चतुर्थांश आहे. ही योजना सुरू झाल्याने 97,000 कोटी रुपयांचा कर विवाद निकाली निघाला आहे.
कराशी संबंधित समस्यांपासून करदाते मुक्त व्हावेत यासाठीचा सरकारचा हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. हे लक्षात घेऊनच त्याची मुदत वाढविण्यात आली आहे. योजनेचा स्वीकार केल्यानंतर करदात्यांना अनेक प्रकारचे कायदेशीर संरक्षण मिळते. प्रत्यक्ष कर ‘विवाद से विश्वास’ कायदा 2020 विविध अपीलीय मंचांसमोर पडून असलेलेल प्रत्यक्ष कर विवाद निकाली काढण्यासाठी 17 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आला होता.
 
PL/KA/PL/27 FEB 2021

mmc

Related post