#प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात कोट्यावधी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस येण्याची शक्यता

 #प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात कोट्यावधी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस येण्याची शक्यता

वाराणसी, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मिर्झापूरच्या चुनार, चांदौली, रामनगरसह एकाच वेळी पाच ठिकाणी लोखंड कारखाना, पीठगिरणी व्यावसायिकाचा कारखाना आणि घरावरील प्राप्तीकर विभागाचे छापे गुरुवारीही सुरू राहिले. मंगळवारी दुपारी सुरू झालेला हा तपास गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास 48 तासांनी संपला. मात्र कागदपत्रांची तपासणी अजुनही सुरु आहे. यात कोट्यावधी रुपयांची कर चोरी उघडकीस येऊ शकते.
कोलकाता येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने स्थानिक अधिकार्‍यांच्या मदतीने ही मोहिम पार पाडली. वाराणसी येथील एका उद्योजकाच्या कोलकत्यासह रामनगर औद्योगिक क्षेत्र, चुनार आदी ठिकाणचे आयकोर सिमेंट कारखाना, पीठ गिरणी, स्पंज लोखंड कारखाना या ठिकाणी मंगळवारी सकाळपासून प्राप्तीकर विभागाचे पथक छापे टाकत होते.
गुरुवारीदेखील चुनार, चांदौलीसह इतर ठिकाणी चौकशी सुरू राहिली. तपासणी दरम्यान कागदपत्रे, संगणक हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात करचोरी ची शक्यता लक्षात घेऊन अधिकारी दक्षता आणि काळजीपूर्वक तपास करत आहेत.
Tag-Incom Tax/Raid/Mirjhapur/Tax evasion
PL/KA/PL/1 JAN 2021

mmc

Related post