शिवसेना ठाकरे गटाने संभाजीराजे छत्रपती यांचा केला होता अपमान

 शिवसेना ठाकरे गटाने संभाजीराजे छत्रपती यांचा केला होता अपमान

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाव रे तो व्हिडिओ’ सांगत, उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यसभेवेळी कोणता ड्राफ्ट लिहून घेतला. त्यांची कशी अहवेलना झाली याबाबत मोठा गौप्यस्फोट आज शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत एकच खळबळ उडवून दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून राज्यसभेला उमेदवारी मागितली होती. त्यानंतर जो काही प्रकार झाला तो पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, ज्या शाहू महाराजांना (Shahu Maharaj) भेटायला गेलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या मुलाचा कसा अपमान केला हे मी दाखवत आहे. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी स्वतः संभाजीराजे यांची माफी मागितली होती. माझी प्रामाणिक इच्छा होती की संभाजीराजे हे खासदार व्हायला पाहिजेत. मला संभाजीराजे यांच्याबरोबर बोलण्यात गुंतवून ठेवले आणि इकडे संजय पवार यांना तिकीट दिलं, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला.

जर संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांना आधीच सांगितलं असतं की, संजय पवार यांना तिकीट देणार आहे. तर संभाजीराजे यांचा अवमान झाला नसता. माझी नार्को टेस्ट करा, माझी प्रामाणिक इच्छा होती संभाजीराजे खासदार व्हावेत. मी चार वेळा सांगितलं होतं की संभाजीराजे यांच्याकडून असं लिहून घेऊ नये. पण मला (त्यावेळच्या) शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी सांगितलं की, आपण उमेदवारी देतोय तर लिहून घ्यायला काय हरकत आहे, असं सामंत यांनी सांगितलं

ज्यावेळी उमेदवारी दिली जाईल त्यावेळी ते शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायत पासून खासदारकीपर्यंत शिवसेनेचा प्रचार करतील. संभाजीराजे जरी पुरस्कृत असले तरी सभागृहात आणि सभागृहाबाहेर पक्षाचेच काम करतील. संभाजीराजेंनी भूमिका मांडत असताना शिवसेनेचीच मानली पाहिजे. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख हेच आमचे नेते आहेत हे मान्य केले पाहिजे, असा ड्राफ्ट लिहून घेण्यात आला होता.

कोणत्याही पक्षात काम करण्याचा निर्णय घेणे किंवा नाही? हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी ग्रामपंचायतपासून खासदारकीच्या स्थरापर्यंत पक्षाचे मुद्दे मांडणे योग्य ठरणार नाही. पण महाविकास आघाडीचे कोण पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवरायांचा विचार गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न करेण. तसंच, गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करेल, असं संभाजीराजे बोलले शिवाय माझ्यासारख्या व्यक्तीची तुम्ही ज्या पद्धतीने अवहेलना करताय ती योग्य नाही. मला उमेदवारी द्यायची तर आता तुम्ही आमच्याकडे यावे असे सांगून ते माझ्या शासकीय निवासस्थानावावरून निघून गेले होते, असा गौप्यस्फोट सामंत यांनी यावेळी केला.

ML/ML/PGB 1 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *