फेब्रुवारीतील जीएसटी संकलन सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटींहून जास्त

 फेब्रुवारीतील जीएसटी संकलन सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटींहून जास्त

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारी महिन्यात वस्तु व सेवा कर (जीएसटी) संकलनाने (GST Collection) सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या काळात जीएसटी संकलन 7 टक्क्यांनी वाढून 1.13 लाख कोटींवर गेले आहे. सरकारी आकडेवारीवरून याची नोंद झाली आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी सांगितले की ही आकडेवारी आर्थिक पुनर्प्राप्तीचे संकेत देते. मात्र संकलन (GST Collection) मागील महिन्यात जमा झालेल्या विक्रमी 1,19,875 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

सीजीएसटी (CGST) 21,092 कोटी रुपये

फेब्रुवारी महिन्यात एकूण जीएसटी महसुल (GST Collection) 1,13,143 कोटी रुपये जमा झाला आहे. त्यात सीजीएसटी (CGST) 21,092 कोटी रुपये, एसजीएसटी (SGST) 27,273 कोटी रुपये आहे. फेब्रुवारीमध्ये आयजीएसटी (IGST) 55,253 कोटी रुपये होते, त्यातील 24,382 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर जमा झाले आहेत. उपकर 9,525 कोटी रुपये जमा झाला असून त्यापैकी 660 कोटी रुपये मालाच्या आयातीवर जमा झाले आहेत.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच महिन्यांत जीएसटी महसुलाचा कल पुनर्प्राप्तीच्या दिशेने असल्याने फेब्रुवारी 2021 या महिन्यात महसुल मागील वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत 7 टक्के जास्त होता. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात वस्तूंच्या आयातीपासून मिळणारा महसुल 15 टक्के जास्त आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसुल (ज्यामध्ये सेवांच्या आयातीचा समावेश आहे) गेल्या वर्षातील याच महिन्यात या स्रोतांकडून मिळालेल्या महसुलाच्या 5 टक्क्यांनी जास्त आहे.
 
PL/KA/PL/2 MAR 2021

mmc

Related post