आगामी आर्थिक वर्षात सरकारला निर्गुंतवणुकीतून मिळणार एवढी रक्कम

 आगामी आर्थिक वर्षात सरकारला निर्गुंतवणुकीतून मिळणार एवढी रक्कम

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात सरकारला (government) निर्गुंतवणुकीतून (disinvestment) 65,000 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, तो चालू वर्षाच्या 78 हजार कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. चालू आर्थिक वर्षात उत्पन्न कमी करुन 78 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे जे आधीच्या अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी होते.

पीएसयुच्या निर्गुंतवणुकीद्वारे (disinvestment) सरकारने (government) आतापर्यंत सुमारे 12,030 कोटी रुपये उभे केले आहेत. यामध्ये एअर इंडियाच्या खासगीकरणातून 2700 कोटी रुपये आणि विविध केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून (CPSE) 9330 कोटी रुप्ये आदींचा समावेश आहे. बीपीसीएल, शिपिंग कॉर्पोरेशन, कंटेनर कॉर्प, आरआयएनएल आणि पवन हंस यांच्या धोरणात्मक विक्रीव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षात जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ही एक मोठी निर्गुंतवणूक आहे.

सरकारने (government) 2020-21 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निर्गुंतवणुकीच्या (disinvestment) उद्दिष्टाच्या तुलनेत 37,897 कोटी उभारले होते. 2019-20 मध्ये, निर्गुंतवणुकीचे उत्पन्न 50,298 कोटी रुपये होते. हे 65,000 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा कमी आहे.

2018-19 आणि 2017-18 या आर्थिक वर्षांमध्ये सरकारने अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य केले होते. 2018-19 मध्ये, 80,000 कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत निर्गुंतवणूक संकलन 84,972 रुपये होते. 2017-18 मध्ये, सरकारने 1 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ओलांडून 1,00,056 कोटी रुपये उभे केले होते.

2016-17 मध्ये सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठले नव्हते. अर्थसंकल्पात 56,500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते, तर सरकारने 46,247 कोटी रुपये उभे केले. 2015-16 मध्ये, सरकारला सीपीएसईच्या निर्गुंतवणुकीतून 23,996 कोटी रुपये मिळाले होते. जे 69,500 कोटींच्या लक्ष्यापेक्षा कमी होते.

The government is expected to get Rs 65,000 crore from disinvestment in the next financial year starting April. However, it is less than the current year’s estimate of Rs 78,000 crore. In the current financial year, the revenue has been reduced to Rs 78,000 crore from Rs 1.75 lakh crore in the previous budget.

PL/KA/PL/2 FEB 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *